शेती मशागतीचा खर्च २५ टक्क्यांनी वाढला 

गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शेतात यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला असून, ट्रॅक्टरच्या साह्याने अनेक कामे कली जातात.
tractor
tractor

सांगली ः गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शेतात यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला असून, ट्रॅक्टरच्या साह्याने अनेक कामे कली जातात. डिझेल वाढत्या दरामुळे मशागतीच्या खर्चात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या इंधन दरवाढीचा थेट फटका शेतकऱ्यालाही बसू लागला आहे. 

जिल्ह्यात शेतीतील मशागतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. अलीकडच्या काळात अल्पभूधारक शेतकरीही ट्रॅक्टर वापरू लागले आहेत. जिल्ह्यात ४३ हजारांहून अधिक ट्रॅक्टरची संख्या आहे. नांगर करण्यापासून ते पालाकुट्टी आणि द्राक्ष आणि डाळिंब बागेत कीटनाशके फवारणीसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर हेत आहे. एक पीक काढले की कमी कालावधीत शेतीची मशागत करून, शेतकरी दुसऱ्या पिकाची तयारी सुरू करतो. यासाठी विविध अवजारे व साहित्य साधनाचा वापर होतो. यंत्रामुळे शेतकऱ्याच्या वेळेच्या बचतीसह परिश्रम वाचले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टररच्या संख्येत भर पडत आहे. 

जिल्ह्यात प्रत्येक गावानुसार मशागतीचे दर वेगळे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला अधिक भार पडत आहे. एकाबाजूला इंधनाचे वाढते दर तर दुसऱ्या बाजूला भाजीपाल्यासह अन्य पिकांना अपेक्षित न मिळणारे दर आणि इंधनवाढीमुळे शेतीमाल वाहतूकदेखील खर्चिक झाली आहे. याची सांगड घालणे शेतकऱ्यांना कठीण बनले आहे. गेल्या वर्षी एकरी ७५०० ते ८००० रुपये येणारा खर्च आता १२,००० ते १३, ५०० रुपयांवर गेला आहे.  अशी झाली दरवाढ  गेल्या महिनाभरापासून डिझेल आणि पेट्रोलच्या दरात दररोज पंचवीस ते तीस पैशांनी वाढ होत आहे. सध्या डिझेलचा प्रति लिटर ८६ रुपये ०५ पैसे इतका आहे. ऑक्टोबर महिन्यात डिझेलचा दर प्रति लिटर ७५ रुपये ६५ पैसे असा दर होता. नोव्हेंबर महिन्यात २ रुपये २४ पैशांनी दरात वाढ झाली. तर डिसेंबर महिन्यात दीड रुपयाने दर वाढले. ३१ जानेवारीला ८२ रुपये १४ पैसे असा दर होता. १८ फेब्रुवारी म्हणजे अठरा दिवसांत ३ रुपये ८१ पैशांनी दर वाढले आहेत.  मशागतीचे दर (प्रति एकर) 

मशागतीचा प्रकार. २०२० २०२१ 
नांगरणी २००० २४०० ते २६०० 
रोटर मारणे २००० २४०० ते २६०० 
खुरटणी १००० १२०० ते १५०० 
सरी पाडणी १००० १२०० ते १६०० 
पेरणी १३०० १४०० ते १५०० 
पालाकुट्टी २००० २२०० ते २५०० 
ऊस बांधणी १००० १२०० ते १४००

प्रतिक्रिया इंधनाच्या वाढत्या दरामुळे मशागतीच्या दरात वाढ झाली आहे. ट्रॅक्टरचा खर्च, चालकाचा पगार आणि वाढते इंधन दर, असा वर्षाला खर्च वाढतोय. त्यामुळे ट्रॅक्टर व्यवसाय धोक्यात आला आहे. मशागतीचा खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांना परवडत नाही. पण त्याला पर्याय नाही.  - सुनील पाटील, ट्रॅक्टर मालक, दूधगाव, ता. मिरज 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com