धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची ओढ

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) निम्मा हंगाम संपत आला आहे. दरवर्षी कोकणासह घाटमाथा आणि सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुक्तहस्त कोसळणाऱ्या पावसाने यंदा ओढ दिल्याचे चित्र आहे.
rain
rain

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) निम्मा हंगाम संपत आला आहे. दरवर्षी कोकणासह घाटमाथा आणि सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुक्तहस्त कोसळणाऱ्या पावसाने यंदा ओढ दिल्याचे चित्र आहे. जुलै महिन्यात समाधानकारक हजेरी लावल्यानंतर या भागात जुलै महिन्यात मॉन्सूनने जोर धरला नसल्याचे चित्र आहे. राज्यातील सर्वाधिक पावसाच्या तालुक्यांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यामध्ये यंदा १८.८ टक्के पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. 

कृषी विभागाच्या महावेध प्रकल्पाअंतर्गत ही माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे दुष्काळी मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील कोरडवाहू असलेल्या तालुक्यामध्ये यंदा मॉन्सून दमदार बरसला आहे. तर दरवर्षी मुबलक पाऊस देणाऱ्या सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील तालक्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झालेली नाही. जून महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे जवळपास सर्व तालुक्याची सरासरी भरून आली, राज्यातील केवळ १२ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला होता. जुलै महिन्यात घाटमाथ्यालगतच्या तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने ४० तालुक्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यात विदर्भातील १० मराठवाड्यातील एका तालुक्याचा समावेश आहे. २९ तालुके मध्य महाराष्ट्र व कोकणाच्या घाटमाथ्याजवळील आहेत.  मराठवाड्यात सर्वाधिक, पश्चिम महाराष्ट्रात सर्वांत कमी एक जूनपासून २८ जुलैपर्यंत राज्यात ४९२.६ मिलिमीटर (९७.३ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. यात सहा कृषी विभागानुसार मराठवाडा विभागात १२७ टक्के तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागात सर्वांत कमी ७१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. नागपूर विभागात ८२ टक्के तर कोकण विभागात ८४.५ टक्के पाऊस पडला आहे. नाशिक विभागात ११५ टक्के तर अमरावती विभागात १०९.२ टक्के पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. 

राज्यात जुलै महिन्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेले तालुके ठाणे : मुरबाड, शहापूर रायगड : कर्जत, खालापूर, सुधागडपाली, महाड,  पालघर : मोखाडा,  नाशिक : सुरगाणा, इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर,  नंदुरबार : नवापूर, तळोदा, अक्कलकुवा, पुणे : पुणे शहर, मुळशी, भोर, वेल्हा, आंबेगाव,  सातारा : पाटण, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, कोल्हापूर : पन्हाळा, शाहुवाडी, राधानगरी, बावडा, करवीर, चंदगड,  लातूर : शिरूर अनंतमाळ,  अकोला : बार्शी टाकळी,  अमरावती : चिखलदरा, भंडारा : पवनी, लाखंदूर, गोंदिया : आमगाव, सालकेसा, चंद्रपूर : ब्रह्मपुरी, गडचिरोली : धानोरा, कोर्ची, देसाईगंज.

मंगळवारपर्यंत (ता. २८) राज्यात विभागनिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) 

विभाग सरासरी पडलेला टक्केवारी
कोकण १६२३.४ १३७२.२ ८४.५
नाशिक ३३७.१ ३८७.७ ११५.०
पुणे ४९१.४ ३५२.४ ७१.३
औरंगाबाद ३०२.२ ३८४.० १२७.१
अमरावती ३६४.० ३९७.४ १०९.२
नागपूर ५१४.३ ४२२.३ ८२.१
एकूण राज्य ५०६.५ ४९२.६ ९७.३

राज्यात महिनानिहाय पडलेला पाऊस (टक्केवारी)

विभाग  जून जुलै
कोकण  ८१.७    ८६.५
नाशिक    १५०.३    ९०
पुणे   १०१.२   ५१.३
औरंगाबाद  १५१.६    १०७.६
अमरावती १२४.१  ९९
नागपूर   ९६.९ ७३.७
एकूण राज्य ११२.६  ८६.६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com