जनावरांचे दवाखाने सक्षम करू : स्वामी

सोलापूर ः ‘‘जिल्ह्यातील पशुसंवर्धन दवाखान्याच्या सक्षमीकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा, सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करून ग्रामनिधीमधून कोणती कामे घेता येतील, हे पाहा. तसेच शेतकरी, दानशूर ग्रामस्थ तसेच पशुसंवर्धन विभागात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या लोकसहभागातून जनावरांचे दवाखाने सक्षम करण्यात येतील’’, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.
 Let's enable veterinary clinics: Swami
Let's enable veterinary clinics: Swami

सोलापूर ः ‘‘जिल्ह्यातील पशुसंवर्धन दवाखान्याच्या सक्षमीकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा, सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करून ग्रामनिधीमधून कोणती कामे घेता येतील, हे पाहा. तसेच शेतकरी, दानशूर ग्रामस्थ तसेच पशुसंवर्धन विभागात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या लोकसहभागातून जनावरांचे दवाखाने सक्षम करण्यात येतील’’, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.  

स्वामी यांच्या दालनात कृषी व पशुसंवर्धन विभागाची ऑनलाइन आढावा बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील जनावरांच्या दवाखान्यांचे सक्षमीकरण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, सर्व पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा कृषी विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

स्वामी म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये फिरत असताना जनावरांचे दवाखाने पाहिले आहेत. त्यांची अवस्था फारच वाईट आहे. दवाखाने माणसांचे असोत वा जनावरांचे ते स्वच्छच हवेत. स्वच्छ शाळा, सुंदर शाळा व जनसंजीवनी अभियानाच्या पार्श्‍वभूमीवर जनावरांच्या दवाखान्यांचे सक्षमीकरण हाती घेण्याची गरज आहे. पशुसंवर्धन दवाखान्यांचे सक्षमीकरण झाले, तर जिल्हा दुग्ध व्यवसायात स्वयंपूर्ण होईल. यासाठी दवाखान्याचा परिसर स्वच्छ करा. कृत्रिम रेतनाची जागा स्वच्छ करा.`` 

‘‘सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करून ग्रामनिधीमधून कोणती कामे घेता येतील. त्याप्रमाणे दवाखाना सक्षमीकरणाची कामे हाती घ्या. निधीची कमतरता आहे, हे लक्षात घेऊन लोकसहभाग  वाढवा,’’ असेही ते म्हणाले. 

‘किसान क्रेडिट कार्ड’चा लाभ घ्या

‘‘राज्य सरकारने पशुधन मालकांसाठी किसान क्रेडिट कार्डची योजना आणली आहे. त्यासाठी ४० हजार इतक्या पशुधनमालकांना लाभ होणार आहे. या किसान क्रेडिट कार्डसाठी पशुधनमालकांना प्रवृत्त करावे. पशुधनमालकांनीही स्वतः आपल्या भागातील पशुसंवर्धन दवाखान्यात संपर्क साधून फॉर्म भरून घ्यावा. हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पशुधनमालकांनी त्याचा लाभ घ्यावा’’, असे आवाहनही स्वामी यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com