रब्बीच्या हंगामात विजेचा अडसर

सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प उभे केले. परंतु दुसरीकडे त्या प्रमाणात विजेचे नियोजन केलेले नसल्यामुळे शेतकरी सिंचनापासून वंचित राहत असल्याची वस्तुस्थिती आहे.
रब्बीच्या हंगामात विजेचा अडसर Lightning strikes during rabbi season
रब्बीच्या हंगामात विजेचा अडसर Lightning strikes during rabbi season

रिसोड, जि. वाशीम  : सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प उभे केले. परंतु दुसरीकडे त्या प्रमाणात विजेचे नियोजन केलेले नसल्यामुळे शेतकरी सिंचनापासून वंचित राहत असल्याची वस्तुस्थिती आहे. सिंचनाच्या मार्गात विजेचा मोठा अडसर तयार झाला आहे.    जिल्ह्यात एकूण असलेल्या प्रकल्पांवरून सुमारे ६८ हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे. परंतु त्या प्रमाणात या प्रकल्पांवरून शेतीला पाणी पुरवण्याकरता विजेचे नियोजन केलेले नाही. जिल्ह्यात मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव, वळवणी बंधारे, असे शेकडोच्या संख्येत प्रकल्प आहेत. यापैकी काही मोठ्या प्रकल्पावरून शहरांना पाणीपुरवठा केला जातो तर उर्वरित इतर प्रकल्प शेती सिंचनाच्या हेतूने तयार करण्यात आले आहेत. या प्रकल्पावरून सुमारे ६८ हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येऊ शकेल. सनाने प्रकल्प उभारणीसाठी कोट्यवधी खर्ची घातले. परंतु या सिंचन क्षेत्रासाठी वाढीव वीज पुरवठा करण्यासाठी रिसोड परिसरात कुठेही ३३ केव्हीचे उपकेंद्र उभारले नाही. त्यामुळे आज रोजी शेतकऱ्यांची सिंचन समस्या कायमच आहे. दररोज वीज समस्यांबाबत शेतकऱ्यासह विविध सामाजिक संघटनांच्या तक्रारींचा पाऊस पडत आहे.  वर्षी पावसाळा भरपूर झाल्यामुळे तसेच परतीचा पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प तुडुंब भरलेले आहेत. परंतु वीज नसल्यामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम अडचणीत सापडला आहे. उपलब्ध आहे त्या विजेचा पुरवठाही नियमित व पुरेशा दाबाने केल्या जात नाही.  जिल्ह्यात जून २०२० अखेर ६८ हजार २४७ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे. मात्र एवढे सिंचन कधीही होत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

प्रतिक्रिया माझ्याकडे चार एकर शेती आहे. वाडी रायताळ प्रकल्पावरून एक लाख रुपये खर्च करून पाइपलाइन केली. परंतु त्या ठिकाणी एकाच रोहित्रावरून दहा ते पंधरा जणांना वीजपुरवठा केला आहे. वीज फक्त रात्रीच्या वेळेसच आठ तास असते. या आमच्या रोहित्रावर खूप भार असल्याने वीजपुरवठा खंडित होतो. धरणात पाणीसाठा असूनही हरभरा व गहू वाळण्याच्या मार्गावर आहे. - कैलास लांडगे, शेतकरी, भोकरखेडा ता. रिसोड जि. वाशीम

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com