पुणे जिल्ह्यातील पशुधनाला मिळणार गोठ्यातच उपचार

पुणे ः ‘‘जिल्ह्याच्या ग्रामिण आणि दुर्गम भागातील पशुधनाला गोठ्यातच वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने फिरत्या पशुचिकित्सालय सुरू केले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त बुधवारी (ता.२६) २५ मोबाईल वाहनांचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी लोकार्पण केले.
पुणे जिल्ह्यातील पशुधनाला मिळणार गोठ्यातच उपचार
Livestock in Pune district will get treatment in the barn

पुणे ः ‘‘जिल्ह्याच्या ग्रामिण आणि दुर्गम भागातील पशुधनाला गोठ्यातच वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने फिरत्या पशुचिकित्सालय सुरू केले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त बुधवारी (ता.२६) २५ मोबाईल वाहनांचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी लोकार्पण केले. 

‘‘फिरते पशुचिकित्सालय सुरू करणारी ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे’’, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष कुमार प्रसाद यांनी दिली. कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबूराव वायकर, सारिका पानसरे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले,‘‘ या वाहनांद्वारे प्रभावी पशुवैद्यकीय सेवा मिळण्यासाठी ही सर्व वाहने जीपीएस प्रणालीवर करावीत. ग्रामीण आणि दुर्गम भागात पशुधनाला वेळेत, परवडणाऱ्या दरात उपचार मिळावेत.’’  

‘‘१९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यास या मोबाईल वाहनांद्वारे ठरलेल्या गावातील शेतकऱ्यांना सेवा मिळेल. तज्ज्ञ शासकीय पशुवैद्यक या वाहनात असतील. अन्य उपचारांसोबतच अवघड शस्त्रक्रियाही या फिरत्या वाहनात होतील. ५० रुपये इतके माफक शुल्क असेल’’, अशी माहिती वायकर यांनी दिली. 

मोबाईल व्हॅन सेवा प्रकार व प्राधान्य ः तातडीच्या सेवा, अपघात, जाग्यावर पडणे, कष्टमय प्रसूती, विषबाधा, सर्पदंश आदी.

निदान आणि उपचार ः ताप, डायरिया, स्तनदाह, कृत्रिम रेतन, अपचन, दूध कमी

नियोजित उपचार ः गर्भ तपासणी, स्वास्थ दाखला, शस्त्रक्रिया, शवविच्छेदन, खच्चीकरण, जंतुनाशके, लसीकरण आदी.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.