परभणी, हिंगोलीत ‘शेतमाल तारण’द्वारे दोन कोटी २२ लाखांचे कर्जवाटप

परभणी ः ‘‘शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील पाच आणि हिंगोली जिल्ह्यातील एका बाजार समितीमार्फत १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत १८६ शेतकऱ्यांना ७ हजार ४६८ क्विंटल शेतीमालावर २ कोटी २२ लाख १५ हजार ९१९ रुपये कर्ज वितरित करण्यात आले’’, अशी माहिती पणन मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पंकज चाटे यांनी दिली.
परभणी, हिंगोलीत ‘शेतमाल तारण’द्वारे दोन कोटी २२ लाखांचे कर्जवाटप
Loan of Rs. 2 crore 22 lakhs to farmers in Parbhani, Hingoli

परभणी ः ‘‘शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील पाच आणि हिंगोली जिल्ह्यातील एका बाजार समितीमार्फत १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत १८६ शेतकऱ्यांना ७ हजार ४६८ क्विंटल शेतीमालावर २ कोटी २२ लाख १५ हजार ९१९ रुपये कर्ज वितरित करण्यात आले’’, अशी माहिती पणन मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पंकज चाटे यांनी दिली.

शेतीमालाचे बाजार भाव कोसळल्यानंतर शेतकऱ्यांचे नुकसान होते. या परिस्थितीत शेतीमाल तारण कर्ज घेऊन तातडीच्या गरजा भागविता येतात. तेजी आल्यानंतर शेतीमालाची विक्री केल्यास फायदा होऊ शकतो. त्यासाठी राज्य पणन महामंडळाअंतर्गत शेतीमाल तारण कर्ज योजना राबविली जात आहे. या अंतर्गत शेतमालाच्या किमतीच्या ७५ टक्के कर्ज ६ टक्के व्याज दराने दिले जाते. यंदा अनेक शेतकऱ्यांनी हरभरा, हळद आदी शेतीमालावर तारण कर्ज घेतले आहे. परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती स्वनिधीतून ही योजना राबवीत आहे. जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी येथील बाजार समित्या पणन मंडळाच्या अर्थसहाय्याने ही योजना राबवीत  आहेत.

डिसेंबर अखेरपर्यंत परभणी जिल्ह्यातील १८५ शेतकऱ्यांना तारण कर्जवाटप करण्यात आले आहे. एकूण ७ हजार ४६८ क्विंटल तारण शेतमालाची किंमत २ कोटी ९६ लाख ३९  हजार ७१८ रुपये आहे. त्यात परभणी बाजार समितीने ३० शेतकऱ्यांना ११९६ क्विंटल शेतमालावर ४१ लाख २ हजार ५२० रुपये कर्ज दिले. जिंतूर बाजार समितीने ६ शेतकऱ्यांना १६९.८५ क्विंटल शेतीमालावर ५ लाख ३ हजार १७८ रुपये, सेलू बाजार समितीने १८ शेतकऱ्यांना ८७४.५० क्विंटल शेतीमालावर २७ लाख ३७ हजार ५ रुपये कर्ज दिले. 

मानवत बाजार समितीने २८  शेतकऱ्यांना १०५७.६० क्विंटल शेतीमालावर ३१ लाख ८५  हजार १९० रुपये कर्ज दिले. पाथरी बाजार समितीने १०३ शेतकऱ्यांना ४१७०.६५ क्विंटल शेतीमालावर १ कोटी १४ लाख ९० हजार २६  रुपये कर्ज दिले. पणन मंडळातर्फे जिंतूर बाजार समितीस ५ लाख ३ हजार १७८ रुपये, मानवत बाजार समितीस २९ लाख  २०० रुपये, पाथरी बाजार समितीस १ कोटी १४ लाख  ८४ हजार ६१४ रुपये असे एकूण १ कोटी ७३  लाख २३ हजार ७८५ रुपये दिले. हिंगोली जिल्ह्यात वसमत बाजार समितीमार्फत एका शेतकऱ्यास ५५ क्विंटल शेतीमालावर १ लाख ९८ हजार रुपये कर्ज देण्यात आले, असे चाटे यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com