भात खरेदी दराची वाढ शेतकऱ्यांच्या पथ्थ्यावर

अनियमित पाऊस, अतिवृष्टी, पूरस्थिती यामध्ये भातशेतीला मोठा फटका बसला. या परिस्थितीमध्ये भात खरेदीच्या दरामध्ये शासनाने केलेली वाढ शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे.
Increase in paddy purchase rate on farmers' diet
Increase in paddy purchase rate on farmers' diet

राजापूर (जि. रत्नागिरी) ः अनियमित पाऊस, अतिवृष्टी, पूरस्थिती यामध्ये भातशेतीला मोठा फटका बसला. या परिस्थितीमध्ये भात खरेदीच्या दरामध्ये शासनाने केलेली वाढ शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे. त्याचा फायदा घेत राजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरेदी-विक्री संघाला सुमारे ८८२.८० क्विंटल भाताची विक्री केली आहे. त्यातून १७ लाख १२ हजार ६३२ रुपयांची उलाढाल झाली आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.  लहरी पाऊस, मनुष्यबळाची कमतरता, मजुरी आणि यांत्रिक साधनांचे वाढते दर आदींमुळे भातशेती तोट्यात आहे. पावसाळी हंगामामध्ये राबूनही त्या तुलनेमध्ये उत्पन्न मिळत नसल्याने अनेकांकडून भातशेतीकडे पाठ फिरवली आहे. त्यातून, यापूर्वी हिरवेगार असलेले भातशेतीचे मळे अलीकडे पडीक असल्याचे चित्र दिसत आहे. भातशेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भातशेती बंद करून रेशन दुकान तसेच बाजारपेठेतून तांदूळ खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. यावर्षी भातशेतीचे अतोनात नुकसान झाले. या स्थितीमध्ये भातखरेदीच्या दरामध्ये शासनाने केलेल्या वाढीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. आहे. या वर्षी संघाकडून १९४० रुपये प्रति क्विंटल दराने भाताची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आली. राजापूर खरेदी केंद्रावर २२ शेतकऱ्यांचे २६७.६० क्विंटल तर पाचल येथील केंद्रावर ३६ शेतकऱ्यांनी ६१५.२० क्विंटल भात विकले. त्यातून, १७ लाख १२ हजार ६३२ रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती खरेदी-विक्री संघाकडून देण्यात आली.  दृष्टिक्षेपात राजापुरात भातखरेदी 

खरेदी केंद्र शेतकरी संख्या क्विंटल आर्थिक उलाढाल 
राजापूर २२ २६७.६० ५,१९,१४४ 
पाचल ३६ ६१५.२० ११,९३,४८८ 
एकूण ५८ ८८२.८० १७,१२,६३२ 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com