नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा

अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्‍यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी.
नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा
Declare a wet drought in the district

नागपूर ः अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्‍यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हुकूमचंद आमधरे यांनी केली आहे.  गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे काढणीला आलेली पिके नामशेष झाली आहेत. तर कपाशी, मका, ऊस, मोसंबी, बाजरीची पिके आडवी झाली आहेत. शेतकऱ्‍यांच्या शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले, पिके पिवळी पडली आहेत. शेतकऱ्‍यांची पिके वाहून गेली आले आहेत. मागील काही वर्षांपासून नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्‍यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे आधीच शेतीचे अर्थचक्र मोडले आहे. त्यात अतिवृष्टीमुळे सलग दुसऱ्‍या वर्षीदेखील खरीप हंगाम हातातून निसटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असल्याचे हुकूमचंद आमधरे यांनी म्हटले आहे.  अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतीचे नुकसान झाले. त्याचेच पंचनामे अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे नवीन नुकसानीचे पंचनामे कधी होणार असा प्रश्न शेतकऱ्‍यांना पडला आहे. त्यामुळे पंचनामे न करता शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्‍यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी हुकूमचंद आमधरे यांनी केली आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.