जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोरः माधवन राजीवन

माधवन राजीवन
माधवन राजीवन

पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्याने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (१ ते ६ जुलै) राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी बुधवारी (ता. २६) ट्विटद्वारे दिली.  दरम्यान, आज (ता. २७) कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. केरळमध्ये आठ दिवस उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनचा पुढील प्रवासही अडखळत झाला. महाराष्ट्रात १९७२ नंतर उशिराने २० जून रोजी मॉन्सून पोचला. मॉन्सूनने सर्व राज्य व्यापल्यानंतर मात्र पावसाने अनेक भागात उघडीप दिली आहे. मॉन्सूनने मंगळवारी संपूर्ण राज्य व्यापल्यानंतर बुधवारी (ता. २६) कोणतीही प्रगती केली नाही. वायव्य, तसेच उत्तर भारतातील राज्यांमध्ये १ ते ३ जुलैपर्यंत मॉन्सून दाखल होण्यास पोषक स्थिती निर्माण झाली आहे. यातच हवामान विभागाने ३० जून रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत दिले आहे.  या पार्श्‍वभूमीवर मॉन्सून जुलै महिन्यात सक्रिय होण्याचा अंदाज राजीवन यांनी वर्तविला आहे. भारतीय हवामान खाते केंद्रातील पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. त्याच मंत्रालयाचे सचिव असलेल्या राजीवन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, यंदा देशात मॉन्सून उशिरा दाखल झाला. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून मॉन्सूनची सातत्याने प्रगती होत आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या पोषक वातारणामुळे पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मॉन्सून सक्रिय होईल. त्यामुळे महाराष्ट्रसह ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आणि गुजरात या भागात १ ते ६ जुलै दरम्यान जोरदार पाऊस पडेल. बुधवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरी कोसळल्या.   बुधवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग)      कोकण : धसई २९, सौंदळ ५५, जैतापूर २८, पुनस ७३, पाटगाव २८, मालवण ७७, पेंडूर ४८, मसुरे २६, आचरा २६, आंबेरी ४५, पोईप ३५, म्हापण ४७, तळेरे ३६, वैभववाडी ४६, येडगाव ४५, चिंचणी ३२, तारापूर ७७. मध्य महाराष्ट्र : पिंपळगाव २५, वावी २२, शेंदुर्णी ४१, पहूर २४, पाचोरा ४६, नांद्रा २८, वरखेडी ३४, पारनेर ४०, देवळाली २३, ब्राह्मणी ४०.८, वेळू २५, संगमनेर २४, बेल्हा ३३, आंबेगाव ६७, न्हावरा ३१, मलठण २१, कोरेगाव ४७, शिरूर ५९, बावडा २७, जेजूरी २१, दुधनी ३३, रोपळे २५, हातीद ५५, कोळा ३८, कोळे ६०, कुक्‍कुडवाड २५, कबनूर २७, गगनबावडा ३६, साळवण २३. मराठवाडा : खंडाळा ३६, लाडगाव २६, जामखेड ४३, उमापूर २३, दिदरूड २४, घाटनांदूर २२, नांदूरघाट २०, धारूर २७, गातेगाव २०, चिंचोली ३२, उस्मानाबाद शहर २४, परांडा २८, पिंगळी ३२. विदर्भ : पातुर्डा २१, कवठळ ३८, वरवंड २२, लोणी ४७, हिवखेड २५, अटाळी ४२, अडगाव २१, वझर २७,  राजगाव २६, केनवड ४९, करंजी २३, चांडस ३१, हिवरा २४, भातकुली २६, पूर्णानगर २६, आष्टी २२, निंभा २३, असरा २०, खाल्लार २३, असेगाव २६, तळेगाव ४९.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com