माजलगाव तालुक्यात २१ हजार टन खतांची मागणी

माजलगाव, जि. बीड : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांनी शेतातील सर्व कामे आटोपली आहेत. तालुक्यात ७८ हजार ७७८ हेक्टर खरीप लागवड लायक क्षेत्र आहे. विविध प्रकारच्या २१ हजार टन खतांची मागणी कृषी विभागाने केली आहे.
In Majalgaon taluka Demand for 21,000 tons of fertilizers
In Majalgaon taluka Demand for 21,000 tons of fertilizers

माजलगाव, जि. बीड : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांनी शेतातील सर्व कामे आटोपली आहेत. तालुक्यात ७८ हजार ७७८ हेक्टर खरीप लागवड लायक क्षेत्र आहे. विविध प्रकारच्या २१ हजार  टन खतांची मागणी कृषी विभागाने केली आहे.

दोन वर्षांपासून सतत धरण भरत आहे. त्यामुळे सर्वत्र पाण्याची उपलब्धता आहे. यावर्षी तालुक्यात सिंचन क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे. परिणामी, नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उसाची नव्याने शेतकऱ्यांनी लागवड केली आहे. खरीप हंगामासाठी ७८ हजार ७७८ हेक्टर लागवड लायक क्षेत्र तालुक्यात आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व शेती मशागतीची सर्व कामे आटोपली आहेत. आता पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. सोयाबीनचे बियाणे शेतकऱ्यांनी घरचेच वापरावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

उगवण क्षमता तपासणी मोहीम, रुंद वरंबा सरी’ पद्धतीवर सोयाबीन लागवड, बीज प्रक्रिया यासह विविध योजनांद्वारे कृषी विभाग सध्या शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत आहे. खरीप हंगामात रासायनिक खतांची २१ हजार २०० टनांची मागणी केली आहे. 

शेतकऱ्यांनी खते, बी-बियाणे खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. लागवड करतेवेळेस बॅग उलट्या बाजूने कापाव्यात जेणेकरून काही अडचण आल्यास तक्रार करता येईल. त्याचबरोबर पेरणीची घाई करू नये. ७५ ते १०० मिमी पर्यंतचा पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी खरिपाची लागवड करावी. खतांची जादा दराने विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी कळवावे. -शिवप्रसाद संगेकर, तालुका कृषी अधिकारी माजलगाव.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com