मेळघाटच्या स्ट्रॉबेरीची पर्यटकांना भुरळ

चिखलदरा, जि. अमरावती : महाबळेश्वरच्या धर्तीवर चिखलदरा तालुक्यातील मोथा व आलाडोह गावात मागील काही वर्षांपासून स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात येत आहे.
मेळघाटच्या स्ट्रॉबेरीची पर्यटकांना भुरळ
Of Melghat strawberries Tourists are fascinated

चिखलदरा, जि. अमरावती : महाबळेश्वरच्या धर्तीवर चिखलदरा तालुक्यातील मोथा व आलाडोह गावात मागील काही वर्षांपासून स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात येत आहे. मेळघाटच्या आदिवासींनी हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. येथील स्ट्रॉबेरीची भुरळ आता पर्यटकांनाही पडली आहे. 

स्ट्रॉबेरीचे नाव घेतले की, महाबळेश्वर नजरेसमोर येते. चिखलदरा आणि महाबळेश्वर या दोन ठिकाणांच्या वातावरणात भौगोलिकदृष्ट्या बरेच साम्य आहे. सुरुवातीला मातीपरीक्षण करून प्रायोगिक तत्त्वावर या ठिकाणी स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली. त्यानंतर शासनाच्या मदतीने शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली. आता हेच शेतकरी स्वखर्चाने स्ट्रॉबेरीची लागवड करीत आहेत.

मोथा व आलाडोह गावातील स्ट्रॉबेरीची ही शेती पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. स्ट्रॉबेरी म्हटले की, लालबुंद गोड आणि दिसायला छान, असे हे फळ खायला आणि हातात घ्यायची हौस पर्यटक आवरू शकत नाहीत. विदर्भातील पर्यटकांसाठी ही एक वेगळीच पर्वणी ठरत आहे. 

विदर्भातील जे पर्यटक महाबळेश्वरला जाऊ शकत नाहीत, ते चिखलदरा तालुक्यातील मोथा व आलाडोह या दोन गावांतच महाबळेश्वरचा आनंद घेऊ शकतात. कित्येकांना तर मेळघाटच्या स्ट्रॉबेरीची चटक लागली आहे.  

पीकविम्यात स्ट्रॉबेरी घ्या 

शासनातर्फे सोयाबीन, तूर, कपाशी, संत्रा यासह अन्य पिकांना  नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळते. मात्र, स्ट्रॉबेरीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांवर प्रचंड संकट कोसळते. त्यामुळे स्ट्रॉबेरीचा पीकविम्यात समावेश करावा, अशी मागणी मोथा येथील शेतकरी साधुराम पाटील यांनी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.