बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्प

बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्प
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्प

बीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाला सोमवारी (ता. १६) जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. शासकीय दूध संघाचे संपूर्ण संकलन झाले. तर, खासगी संघांचे संकलन बंद होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्री शहरातील सोमेश्वर महादेवाला दुधाचा अभिषेक करून आंदोलनाला सुरवात केली.

सोमवारी शहरात विक्रीसाठी आलेल्या सोनई या खासगी दूध उत्पादक संघाच्या गाड्या अडवून हवा सोडली. तसेच त्यातील दुधाचे पुढे काढून इन्फंट संस्थेतील विद्यार्थ्यांना वाटप केले. आंदोलनात महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे, जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, राजू गायके, धनंजय मुळे, अर्जुन सोनवणे, भाऊसाहेब घुगे, विकास आगाऊ, ज्योत्स्ना खोड आदींनी सहभाग घेतला.   १६५०० लिटर संकलन दरम्यान, जिल्ह्यात अंबाजोगाई येथील शासकीय दूध संकलन केंद्रावरून रोज १६ हजार ५०० लिटर होणारे संकलन सोमवारी सुरळीत झाले. मात्र, बीड जिल्हा संघ, बीड तालुका संघ, गेवराई तालुका संघ, आष्टी तालुका संघांकडून रोज होणाऱ्या दूध संकलनापैकी केवळ ३०० लिटर दूध संकलन झाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com