दुधाचे दर वाढण्यास स्थिती अनुकूल

दुधाचे दर वाढण्यास स्थिती अनुकूल
दुधाचे दर वाढण्यास स्थिती अनुकूल

पुणे : राज्याच्या पशुधन पट्ट्यात दुष्काळाची वाढती तीव्रता आणि दूध पावडरच्या बाजारात आलेली तेजी बघता दुधाच्या खरेदी दरातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे. ‘शेतकऱ्यांना भाव वाढून देण्यासारखी स्थिती निश्चितपणे तयार होत आहे,’ अशी माहिती दुग्ध क्षेत्रातील सूत्रांनी दिली. देशातील दूध उत्पादक राज्यांमधून गेल्या महिन्यात ३५ हजार टन दूध पावडर निर्यात झाली. त्या आधी विदेशी बाजारात भारतीय पावडरला अजिबात मागणी नव्हती. परिणामी पावडरचे प्रचंड साठे देशात पडून होते. ‘गुजरात, महाराष्ट्र सरकारकडून पावडर निर्यातीला अनुदान मिळाल्यामुळे पावडरचे साठे झपाट्याने घटले आहेत. महाराष्ट्रात सध्या १० हजार टनाच्या खालीच पावडर उपलब्ध आहे. पावडरची टंचाई पुढे वाढत जाईल व भावदेखील मजबूत होतील. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना जादा दर मिळतील,’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात सध्या किती पावडरचा साठा आहे, या पैकी निर्यात किती झाला, दुधाचे दर पावडर जास्त असताना किती होतो व भविष्यात किती असतील, याचा अंदाज दुग्धविकास विभागाला आहे. मात्र, कोणतीही अधिकृत माहिती दुग्ध विकास अधिकाऱ्यांकडून अद्याप तरी देण्यात आलेली नाही. देशात दूध पावडरचे दर प्रतिकिलो १८० ते १९० रुपये होते. आता २०० ते २२० रुपये किलोपर्यंत दर गेलेले आहेत.   राज्यातील दूध पावडरचे बाजारदेखील १४० रुपयांवरून १८० रुपयांच्या पुढे गेल्याचे सांगितले जाते. ‘दूध दरासारखे पावडरचे बाजार निश्चित किती वाढले याची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे पुढील अंदाज बांधता येत नाही,’ असे गावपातळीवरील दूध संकलन सोसायट्यांच्या सचिवांचे म्हणणे आहे. पावडरला मागणी असल्यामुळे राज्यातील खासगी दूध डेअऱ्यांच्या नफ्यात वाढ झालेली आहे. ‘पुढील सात महिने राज्यात दुष्काळ राहणार असून मार्चनंतर जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार नाही. तसेच, साखर कारखाने बंद होत असल्यामुळे चाऱ्याची समस्या गंभीर बनेल. यामुळे मार्चपासून दूध पुरवठ्यात घट अपेक्षित आहे. त्यामुळे दुधाचे भाव वाढतील,’ अशी माहिती सहकारी दूध संघांच्या सूत्रांनी दिली. ...होता ३० रुपये दर चार वर्षांपूर्वी दूध पावडरचे बाजार २८० ते २९० रुपयांच्या आसपास गेले होते. त्यामुळे राज्यातील खासगी डेअरी चालकांनी दुधाला २८-३० रुपये दर दिला होता. गेल्या वर्षी पावडरचे दर १३० रुपये होताच दुधाचा भाव थेट १८ रुपयांवर आणले गेले. आता पावडरचे दर वाढल्यामुळे दुधाचे दर कधी वाढतील, याकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com