
हिंगोली ः ‘‘जिल्ह्यातील वसमत येथील राष्ट्रीय महामार्गावरील कनेरगाव शिवारात ६५ एकांवर मॉडर्न मार्केट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील जयपूर, बेंगलोरनंतर वसमत येथे जागतिक दर्जाची बाजारपेठ उपलब्ध होईल’’, अशी माहिती पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
प्रजासत्ताकदिनी बुधवारी (ता.२६) संत नामदेव कवायत मैदानावर गायकवाड यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम झाला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, उपाध्यक्ष मनीष आखरे, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आदी उपस्थित होते.
गायकवाड म्हणाल्या, ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टी, पुरामुळे बाधित झालेल्या २ लाख ९७ हजार ८६७ शेतकऱ्यांना ७५ टक्के निधी मदत म्हणून २२२ कोटी ९४ लाख निधी मिळाला आहे. यापैकी २०८ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला. अजून ५६ लाख १४ हजार रुपये निधीची शासनाकडे केली आहे. जिल्ह्यात ६६३ गावात जलजीवन मिशनची मोहीम राबविली जात आहे.’’
गायकवाड म्हणाल्या, ‘‘पंतप्रधान आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीणमध्ये १९ हजार ८६० पैकी १५ हजार ९३० घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. येत्या मार्च अखेरपर्यंत उर्वरित ३९३० घरकुलांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील ५०२० बचत गटांना ७ कोटी ५० लाख ७५ हजार रुपये फिरता निधी दिला.’’
‘‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा राष्ट्रीय कृषी योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना अनुसूचित जाती व जमाती या योजनेत २०२०-२१ आणि २०२१-२२ साठी ९१४ विहिरींच्या कामांना मंजुरी मिळाली. आतापर्यंत १२५ विहिरींची कामे पूर्ण झाली. तर ४५० विहिरींची कामे प्रगतिपथावर आहेत. जपानच्या प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. आकिरा मियावाकी यांच्या मॉडेलनुसार जिल्ह्यात १०.५३ हेक्टर क्षेत्रावर २० घनवन तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये ३ लाख ४२ हजार ९०० वृक्षांची लागवड करण्यात आली,’’ असेही त्यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.