मोदी म्हणाले, शेतकरी माझ्यासाठी मेलेत का? : राज्यपाल सत्यपाल मलिक

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे भाजप नेतृत्वावरील हल्ले सुरूच असून सोमवारी (ता. ३) त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना त्यांना ‘उद्धट’ असे म्हटले आहे.
मोदी म्हणाले, शेतकरी माझ्यासाठी मेलेत का? : राज्यपाल सत्यपाल मलिक
Modi said, did farmers die for me?

चंडीगड ः मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे भाजप नेतृत्वावरील हल्ले सुरूच असून सोमवारी (ता. ३) त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना त्यांना ‘उद्धट’ असे म्हटले आहे. ‘शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्यावरून मी पंतप्रधानांना भेटायला गेलो होतो पण याच मुद्यावरून आम्हा दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन ही बैठक पाच मिनिटांमध्ये संपल्याचे मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

हरियानातील दादरी येथील कार्यक्रमामध्ये बोलताना मलिक म्हणाले की, ‘‘ शेतकऱ्यांच्या मुद्यावरून मी पंतप्रधान मोदी यांना भेटायला गेलो तेव्हा पाच मिनिटांमध्ये माझा त्यांच्याशी वाद सुरू झाला. मोदी खूप घमेंडीत बोलत होते. या आंदोलनामध्ये पाचशे लोक मरण पावल्याचे मी त्यांना सांगितले ते तेव्हा ते म्हणाले की ते काही माझ्यासाठी मेले आहेत का? यावर मी देखील त्यांना तुमच्यासाठीच ते मेले असल्याचे सांगितले. तुम्ही राजा होऊन बसले आहात असे मी त्यांना सुनावले. यानंतर माझे त्यांच्याशी भांडण झाले. त्यामुळे त्यांनी मला अमित शहा यांना भेटायला सांगितले नंतर मी शहांना देखील भेटलो.’’ शेतकऱ्यांच्या इतर सगळ्याच गोष्टी बिघडून टाकण्याऐवजी त्यांच्या मालाला किमान हमी भाव देणे गरजेचे असल्याचेही मलिक यांनी स्पष्ट केले.

मोदी-शहांनी माफी मागावी : कॉंग्रेस नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनातील मृत्यूंबद्दल मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले आहे. मलिक खोटे असतील तर त्यांना बडतर्फ करावे, नाही तर मोदी-शहांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, असे आव्हान कॉँग्रेसने दिले आहे.

शेतकऱ्यांशी संबंधित असंख्य विषय अजूनही प्रलंबित आहेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांविरोधातील गुन्हे तातडीने मागे घेणे गरजेचे आहे. सरकारने याबाबत किमान प्रामाणिकपणा दाखवावा. किमान हमीभावाला कायदेशीर अधिष्ठान मिळायला हवे.  - सत्यपाल मलिक, राज्यपाल मेघालय

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.