मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट

अडत नियमानुसार घेतली जात नाही. मात्र, वेगळ्या पद्धतीने वसूल केली जाते. बाजार समिती व बिगर बाजार समिती नियंत्रित ठिकाणी होत असलेल्या लिलावाबाबत शासनाने लक्ष घालावे. यातून शेतकऱ्यांची लूट थांबेल. जर असा प्रकार पुन्हा घडला तर आंदोलन छेडण्यात येईल. - दीपक पगार, प्रांतिक सदस्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना
कपात
कपात

नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर’ या नावाखाली शेतकऱ्यांच्या पैशातून कपात सुरू असल्याचे निदर्शनास आले. संबंधित शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तक्रार केल्यानंतर मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने ही बाब गांभीर्याने घेतली असून संबंधित आडत्यावर कारवाई करणार असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.  याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेतकरी संदीप काकडे यांनी बाजार समितीमध्ये संबंधित व्यापाऱ्याला हिरवी मिरची दिली असता. त्यांना व्यापाऱ्याने व्यवहार पावती दिली. सदर पावतीवर पैशाचा तपशील व खाली ''इतर'' या नावाखाली रक्कम कापलेली होती. विशेष म्हणजे दिलेल्या पावतीवर ''इतर'' हा रकाना मुद्रित केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली आहे.  सदर घटनेबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक पगार व शेतकऱ्यांनी सहायक निबंधक, मालेगाव यांना फोन करून याची कल्पना दिली. त्याचप्रमाणे त्यांना पुरावे सादर केले. त्यासोबत अशाप्रकारे कोणी व्यापारी चुकीच्या पद्धतीने आडत घेऊन लूट करत असेल तर लक्ष घालावे, असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आले. त्यानुसार या प्रकरणाबाबत सहायक निबंधक श्री. बदनाळे यांनी बाजार समितीला त्वरित कारवाई करण्यास भाग पाडले.  मासिक मीटिंगमध्ये संचालक मंडळाने याची दखल घेत, ‘‘जो व्यापारी अशा गैरप्रकारे आडत घेत असेल त्याचे लायसन्स त्याच ठिकाणी निलंबित करण्यात येईल, तसेच बाजार समितीने दिलेला गाळा लगेच खाली करून घेतला जाईल,’’ अशा स्वरूपात प्रत्येक व्यापाऱ्याला नोटीस पाठवल्या आहेत. यासह या प्रकरणाबाबत चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यामुळे यात आडत्याकडून गैरव्यवहार घडल्याचे समोर आले आहे.  बाजार समितीचा सेस बुडविण्याचा प्रकार  अजूनही अनेक फळव्यापारी कोऱ्या कागदावर हिशेबपट्ट्या तयार करतात. हा व्यवहार कुठल्याही रेकॉर्डवर नसतो. त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता नसते. बाजार समितीचा महसूल बुडतो. या व्यवहारानुसार जो सेस बाजार समितीला मिळणार असतो, तो दडपण्याचा प्रकार असल्याचे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रतिक्रिया शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. याबाबत काम सुरू असून संबंधित व्यापाऱ्याच्या संदर्भात चौकशी समिती नेमून चौकशी झाली. यात हा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. त्यावर आम्ही लवकरच कारवाई करणार आहोत. जर कुणी असा गैरप्रकार केला तर परवाने निलंबित करणार आहे. असा प्रकार घडल्यास शेतकऱ्यांनी थेट तक्रार करावी.  - राजेंद्र जाधव, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मालेगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com