मॉन्सूनने मराठवाडा, विदर्भ व्यापला

मॉन्सूनने मराठवाडा, विदर्भ व्यापला
मॉन्सूनने मराठवाडा, विदर्भ व्यापला

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. २४) संपूर्ण मराठवाडा, विदर्भ व्यापला; तर कोकण वाटचाल रेंगाळलेल्या मॉन्सूनने चार दिवसांनंतर वाटचाल करत अलिबागपर्यंत धाव घेतली. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, मालेगावपर्यंत मॉन्सून पोचला आहे. बुधवारपर्यंत (ता. २६) मॉन्सून मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागासह संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने वाटचाल सुरू केली आहे. गुरुवारी (ता. २०) कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पोचणाऱ्या मॉन्सूनचा मजल दरमजल प्रवास सुरूच आहे. रविवारी (ता. २३) मॉन्सूनने मध्य महाराष्ट्र, विदर्भाचा आणखी काही भाग, मराठवाड्याचा बहुतांशी भाग व्यापला. त्यानंतर सोमवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हजेरी लावत अलिबाग, मालेगावपर्यंतचा टप्पा गाठला.  केरळात यंदा आठवडाभर उशिराने आलेल्या मॉन्सूनच्या वाटचालीवर अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे परिणाम झाला. त्यामुळे वाऱ्याचा वेग मंदावलाच, तसेच बाष्प ओढून नेल्याने पाऊसही लांबला. महाराष्ट्रातील आगमन उशिराने होत १९७२ नंतर यंदा सर्वांत उशिरा २० जून रोजी मॉन्सून तळकोकणात पोचला. त्यानंतर मात्र मॉन्सूनचा उत्तरेकडील प्रवास वेगाने होत आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com