महावितरण विरोधात कऱ्हाडमध्ये शुक्रवारी मोर्चा

शेतकऱ्यांना बोगस, चुकीची वीजबिले देऊन त्यांचे शोषण करण्याचे काम महावितरणकडून सुरू आहे. तिपटीने बिले वाढवून देऊन पुन्हा ५० टक्के बिल कमी केले, असे सांगायचा प्रकार सुरू आहे.
महावितरण विरोधात कऱ्हाडमध्ये शुक्रवारी मोर्चा
Morcha on Friday in Karhad against MSEDCL

कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांना बोगस, चुकीची वीजबिले देऊन त्यांचे शोषण करण्याचे काम महावितरणकडून सुरू आहे. तिपटीने बिले वाढवून देऊन पुन्हा ५० टक्के बिल कमी केले, असे सांगायचा प्रकार सुरू आहे. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन महावितरण विरोधात शुक्रवारी (ता. २८) आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिली.

आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महावितरणने असेच सुरू ठेवल्यास शेतातील टॉवर, विजेचे खांब तोडून टाकू, असाही इशारा पदाधिकाऱ्यांनी या वेळी दिला. शेतीमित्र अशोकराव थोरात, शेकापचे अॅड. समीर देसाई, अॅड. जयवंतराव मोहिते, ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, रयत क्रांतीचे नेते अनिल घराळ, बळिराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, तात्या पाटील, अशोक लोहार आदी उपस्थित होते. 

श्री. पाटील म्हणाले, की कोणतेही सरकार आले तरी शेतकऱ्यांच्या विकासाचे कोणीही बघत नाही. सत्तेत आले की विरोधी पक्षाने सरकारविरोधात बोलायचे असे सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर नियमित कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली. या दोन्ही घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. त्याचबरोबर महावितरणकडूनही शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. दुप्पट, तिप्पट बिले त्यांना देण्यात येत आहेत. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना वीज दिली जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.