पाणीपट्टी ऊसबिलातून वसूल केल्यास आंदोलन

पाटबंधारेचे कर्मचारी शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची वसुली ऊसबिलातून करण्यासंदर्भात दबावाने संमतिपत्र घेत आहेत. याला शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचा तीव्र विरोध आहे. आदेश तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पाणीपट्टी ऊसबिलातून वसूल केल्यास आंदोलन
Movement if water bill is recovered from Usbila

सांगली ः  शेतकऱ्यांकडील पाणीपट्टीची रक्कम साखर कारखान्यांनी उसाच्या बिलातून वसूल करून पाटबंधारे विभागास देण्याबाबत पत्र दिले आहे. साखर आयुक्त यांनीही सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांना कळविले आहे. पाटबंधारेचे कर्मचारी शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची वसुली ऊसबिलातून करण्यासंदर्भात दबावाने संमतिपत्र घेत आहेत. याला शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचा तीव्र विरोध आहे. आदेश तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शासनाच्या सहकार व वस्त्रोद्योग विभागाच्या २००३ च्या आदेशात पाटबंधारे विभागाच्या सिंचन योजनेची पाणीपट्टीची वसुली यादी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्यांना दिली. त्यावर शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलातून रक्कम वसुल करून ती पाटबंधारे विभागास जमा करावी असे म्हटले आहे. सहसंचालक विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी २०१७ मध्ये सर्व कारखान्यांना शेतकऱ्यांकडे असलेली पाणीपट्टीची रक्कम उसाच्या बिलातून वसूल करून पाटबंधारे विभागास देण्याबाबत पत्र दिले आहे. साखर आयुक्तांनी सर्व कारखान्यांना तसे कळविले आहे.

पत्रांचा व आदेशांचा आधार घेऊन कारखाने शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून पाणीपट्टीची वसुली करतील, अशी शंका वाटते. पाटबंधारे विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची वसुली ऊसबिलातून करण्यासाठी शेतकऱ्यांकडून संमतिपत्र घेत आहेत. याला शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचा तीव्र विरोध आहे. शासनाने वेगवेगळे आदेश काढून शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग बंद करावा. सर्व कारखान्यांनीही पीककर्ज वगळता कोणत्याही कपाती ऊसबिलातून करू नयेत. शेतकऱ्यांनीही बिलातून रक्कम वसूल करण्यासाठी संमतीपत्रावर सही करू नये, असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केले.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com