मुळा, भंडारदरा,  निळवंडेतून विसर्ग 

अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्यामुळे भंडारदरा मुळा निळवंडे धरणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे तीनही धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
मुळा, भंडारदरा धरणातून विसर्ग सुरू mula, bhandardhara, nilwandwe dam start Discharge water
मुळा, भंडारदरा धरणातून विसर्ग सुरू mula, bhandardhara, nilwandwe dam start Discharge water

नगर : अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्यामुळे भंडारदरा मुळा निळवंडे धरणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे तीनही धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. २६ टीएमसी क्षमतेचे मुळा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे धरण प्रशासनाने जाहीर केले आहे.   अकोले तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या जोरदार पावसामुळे पंधरा दिवसांपूर्वी भंडारदरा आणि निळवंडे धरण भरले. मुळा धरण आताही पाण्याचे जोरदार आवक झाली. मागील आठवड्यात ९५ टक्के पाणी साठा झाल्यानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला होता परंतु पाण्याची आवक कमी होताच निसर्ग पुन्हा बंद करण्यात आला. बुधवारी (ता.२२) रात्री धरणात ९९.२२ टक्के झाल्यानंतर धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जाहीर करून दोन हजार क्युसेकने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला. गुरुवारी (ता. २३) सकाळी तो विसर्ग कायम होता. १५२३ क्युसेकने मुळा धरणात पाण्याची आवक सुरू आहे. दोन्ही कालव्यांतूनही पाण्याचे आवर्तन सुरू केले आहे. धरणसाठा ९९.२२ टक्के झाला आहे. त्यामुळे धरण परिचलनानुसार नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. तीस सप्टेंबरअखेर धरणसाठा स्थिर ठेवून उर्वरित पुराचे पाणी नदीपात्रात व कालव्यांद्वारे सोडले जाणार आहे. १५ ऑक्टोबर दरम्यान धरणाखालील मुळा नदीपात्रातील डिग्रस, मानोरी, मांजरी व वांजूळपोई बंधाऱ्यांमध्ये टप्प्याटप्प्याने फळ्या टाकून बंधारे भरले जातील. १५ ऑक्टोबर रोजी बंधारे व धरण शंभर टक्के भरले जाईल. सकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातून ११७० क्युसेक, तर निळवंडे धरणातून २३७० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत होते. नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत असल्याने नांदूर मधमेश्‍वरमधून १५ हजार ७७५ क्युसेक विसर्ग केला जात असल्यामुळे गोदावरी नदीची पाणीपातळी वाढली आहे. या वर्षी धरणासाठी पावसाची परिस्थिती चांगली असल्याचे पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अभियंता हरिश्‍चंद्र चकोर यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com