नगर जिल्हा बॅंक निवडणूक; सतरा जागा बिनविरोध

नगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी अखेरच्या क्षणापर्यंत या घडामोडी सुरू होत्या.२१पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या, तर ४ जागांसाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
नगर जिल्हा बॅंक निवडणूक; सतरा जागा बिनविरोध
नगर जिल्हा बॅंक निवडणूक; सतरा जागा बिनविरोध

नगर : नगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी झालेल्या राजकीय उलाढालीत दिग्गजांनी आपापले गड शाबूत ठेवण्यासाठी इतरांनी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. अखेरच्या क्षणापर्यंत या घडामोडी सुरू होत्या. त्यातून २१पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या, तर ४ जागांसाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

बॅंकेच्या २१ जागांसाठी १९८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांतील १७३ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता ४ जागांसाठी ८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जागा बिनविरोध येण्यासाठी नेत्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवत एकमेका सहाय्य करू ची भूमिका बजावली. निवडणुकीतून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अरुण जगताप व संग्राम जगताप, माजी आमदार वैभव पिचड व पांडुरंग अभंग, सत्यजित कदम, सुभाष पाटील या नेत्यांनी माघार घेतली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सर्व परिस्थितीवर लक्ष  ठेवून होते.

पारनेर, नगर व कर्जत सेवा संस्था मतदारसंघांसह बिगरशेती मतदारसंघात निवडणूक होत आहे. या चारही लढती चुरशीच्या होणार आहेत. विशेष म्हणजे, नगर सेवा संस्था मतदारसंघात भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना या वेळी निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यांना सत्यभामा बेरड यांनी आव्हान दिले आहे.  बिगरशेती मतदारसंघात बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड व दत्तात्रय पानसरे यांनी आव्हान दिले आहे.

कर्जत सेवा संस्था मतदारसंघात थोरात गटाच्या मीनाक्षी साळुंके व विखे गटाचे अंबादास पिसाळ आणि पारनेर सेवा संस्था मतदारसंघात उदय शेळके व रामदास भोसले यांच्यात लढत होत आहे. यात कोण विजयी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातील काही लढतींत आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना छुपी साथ द्यावी लागणार आहे. या छुप्या साथीमुळे विरोधकांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.

बिनविरोध उमेदवार असे    सेवा संस्था मतदारसंघ - अण्णासाहेब म्हस्के (राहाता), चंद्रशेखर घुले (शेवगाव), मंत्री शंकरराव गडाख (नेवासे), विवेक कोल्हे (कोपरगाव), आमदार मोनिका राजळे (पाथर्डी), राहुल जगताप (श्रीगोंदे), अमोल राळेभात (जामखेड), सीताराम गायकर (अकोले), अरुण तनपुरे (राहुरी), माधवराव कानवडे (संगमनेर), भानुदास मुरकुटे (श्रीरामपूर), आमदार आशुतोष काळे (कोपरगाव).   महिला प्रतिनिधी मतदारसंघ - अनुराधा नागवडे (श्रीगोंदे), आशा काकासाहेब तापकीर (कर्जत).   शेतीपूरक, तसेच शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था मतदारसंघ - अमित अशोक भांगरे (अकोले).   विमुक्त जाती, भटक्‍या जमाती मतदारसंघ - गणपतराव सांगळे (संगमनेर).   इतर मागासवर्ग - करण जयंतराव ससाणे (श्रीरामपूर).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com