नगर जिल्ह्यात नगर पंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेसच वरचढ

नगर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींच्या निवडणकीत एकूण सतरा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षाने कर्जतला १५, पारनेरला ७ जागा जिंकल्या. अकोल्यात भाजपला १२ जागा मिळाल्या.
नगर जिल्ह्यात नगर पंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेसच वरचढ
In Nagar district, NCP is leading in Nagar Panchayat elections

नगर ः नगर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींच्या निवडणकीत एकूण सतरा जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षाने कर्जतला १५, पारनेरला ७ जागा जिंकल्या. अकोल्यात भाजपला १२ जागा मिळाल्या. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच वरचढ ठरली आहे. 

नगर जिल्ह्यात कर्जत, पारनेर व अकोले नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. नगर जिल्ह्यात कर्जत नगर पंचायतीत माजी मंत्री राम शिंदे व आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कर्जत नगर पंचायतीच्या निवडणुकी आधीपासूनच सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, तालुक्यातील प्रमुख नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीच्या काळात भाजप उमेदवारांचा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा अशा अनेक घडामोडीमुळे कर्जत नगर पंचायतीची निवडणूक चांगलीच गाजली. राष्ट्रवादी दडपशाही करत असून, लोक दडपशाही मोडीत काढतील असा विश्‍वास भाजपकडून व्यक्त केला होता. मात्र मतातून तसे काही दिसले नाही. बुधवारी झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस मित्रपक्षाने १५ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली. भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या.  अकोले नगर पंचायत निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांच्या विरोधात आमदार किरण लहामटे यांच्यासह सर्वच पक्षीय नेते एकत्र आले होते. येथेही पिचड यांच्यावर सतत आरोप केले जात होते. मतमोजणीनंतर मात्र अकोले नगरपंचायतीत पिचड किंगमेकर ठरले. येथे भाजपला १२ जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला २, काँग्रेसला १ व शिवसेनेला दोन जागा मिळाल्या.  पारनेर नगर पंचायतीत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, आमदार नीलेश लंके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राष्‍ट्रवादी, शिवसेना व भाजप-शहर विकास आघाडी असा संघर्ष झाला. या निवडणुकीत राष्‍ट्रवादीला सात, शिवसेनेला सहा, भाजप व शहर विकास आघाडीला ३ तर तीन अपक्ष निवडून आले आहेत. या निवडणुकीत माजी आमदार विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटी यांचा पराभव झाला. त्यामुळे येथे राष्ट्रवादीला बहुमत असले, तरी सत्ता स्थापन करण्याला कसरत करावी लागणार आहे. येथे राष्ट्रवादीचाच नगराध्यक्ष होईल, असे आमदार नीलेश लंके यांनी लगेच जाहीरही केले आहे. 

विजयी उमेदवार असे ः  पारनेर ः शालूबाई ठाणगे, सुप्रिया शिंदे, योगेश मते, नवनाथ सोबले, नितीन अडसूळ, नीता औटी, विद्या गंधाडे, भूषण शेलार, हिमानी नगरे, सुरेखा भालेकर, अशोक चेडे, विद्या कावरे, विजय औटी, नीता ठुबे, जायदा शेख, युवराज पठारे, प्रियंका औटी.  अकोले ः विमल मंडलिक, सागर चौधरी, प्रतिभा मनकर, हितेश कुंभार, सोनाली नाईकवाडी, स्वेताली घोलप, आरीफ शेख, बाळासाहेब वडजे, शीतल वैद्य, नवनाथ शेटे, वैष्णवी धुमाळ, तमन्ना शेख, जनाबाई मोहिते, शरद नवले, प्रदीप नाईकवाडी, माधुरी शेणकर, कविता शेळके,  कर्जत ः ज्योती शेळके, लंकाबाई खरात, संतोष म्हैत्रे, आश्‍विनी दळवी, रोहिणी घुले, मोनाली ताटे, सतीश तोरडमल पाटील, भाऊसागेब तोरडमल, अमृत काळदाते, उषा राऊत, मोहिना पिसाळ, नामदेव राऊत, सुवर्णा सुपेकर, ताराबाई कुलथे, भास्कर भैलुमे, प्रतिभा भैलुमे, छाया शेलार.    

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.