नगर जिल्हा परिषदेवर बत्तीस वर्षांनंतर प्रशासक

नगर ः पंचवार्षिक मुदत संपल्याने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर शासनाने प्रशासक नियुक्त केला आहे. तब्बल बत्तीस वर्षांनंतर दुसऱ्यांदा प्रशासक नियुक्त केला आहे.
On Nagar Zilla Parishad Thirty-two years later the administrator
On Nagar Zilla Parishad Thirty-two years later the administrator

नगर ः पंचवार्षिक मुदत संपल्याने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर शासनाने प्रशासक नियुक्त केला आहे. तब्बल बत्तीस वर्षांनंतर दुसऱ्यांदा प्रशासक नियुक्त केला आहे. १९९० मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सीताराम कुंटे यांनी दोन वर्षे प्रशासक म्हणून काम केले होते. आता दुसऱ्यांदा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्याकडे प्रशासक म्हणून कारभार गेला आहे.

राज्यातील काही प्रमुख जिल्हा परिषदांत नगरचा क्रमांक लागतो. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात काम करणाऱ्या नेत्यांनी नगर जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केले आहे. आता सदस्यांच्या पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने व अजून साधारणपणे सहा महिने तरी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूका होण्याची शक्यता नाही. ७३ व्या घटनादुरुस्तीनुसार मुदत संपलेल्या पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देता येत नाही. त्यामुळे प्रशासकाची नियुक्ती केली आहे.  

  क्षीरसागरांची बदली, कारभार लांगोरेकडे

नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांची बदली झाल्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाोजी लांगोरे यांच्याकडे प्रभारी कारभार आला आहे. त्यामुळे नवीन ‘सीईओ’ येईपर्यंत प्रशासक म्हणून लांगोरे हेच काम पाहतील. लांगोरे यांनी पदभार घेताच अनेक योजनांचा आढावा घेत क्षीरसागर यांच्या काळात सुरू केलेल्या योजना, उपक्रम नेटाने पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com