नागपूर जिल्ह्यात एक कोटी ६३ लाखांचा निधी केंद्राने घेतला परत

नागपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना आणली. या योजनेंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत.
नागपूर जिल्ह्यात एक कोटी ६३ लाखांचा निधी केंद्राने घेतला परत
In Nagpur district, the center took back the funds of one crore 63 lakhs

नागपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना आणली. या योजनेंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत. करदाते, नोकरदार असलेल्या सहा हजारांवर शेतकऱ्यांनी खात्यात जमा झालेला शेतकरी सन्मान निधी केंद्र सरकारला परत केला. ही रक्कम सुमारे एक कोटी ६३ लाखांच्या घरात आहे. 

शासकीय यंत्रणेला पुरेसा वेळ मिळाला नसल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. त्यामुळे सात-बारावर ज्यांची नावे आहेत, त्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जात आहे. यात धनाढ्य शेतकरी, व्यावसायिक शेतकरी तसेच नोकरदार शेतकऱ्यांचाही समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात दोन लाख १० हजार ३३८ शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत पैसे वळते करण्यात आले. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून काही निकष निश्चित करण्यात आले. निकषात बसत नसलेल्या शेतकऱ्यांकडून दिलेले पैसे परत घेण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले. 

जिल्ह्यात ६ हजार ३१ शेतकरी निकषात बसत नसल्याचे समोर आले. त्यांना पैसे परत करण्याच्या सूचना दिल्या. पैसे परत न केल्यास थेट बँकेतून पैसे वळते करण्याचा इशारा प्रशासनाने दिला. अपात्र शेतकऱ्यांनी पैसे परत करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ५,७३० शेतकऱ्यांनी एक कोटी ६३ लाख ७२ हजार रुपये परत केल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. काही शेतऱ्यांना पैसे परत करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्या खात्यातून रक्कम कपात करून शासन जमा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.