नगरच्या सहकारावर नागवडे, मुरकुटेंची पकड

उस्मानाबाद : नगर ः जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी व श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अधिक चर्चेत राहिली. श्रीगोंद्यात राजेंद्र नागवडे, श्रीरामपुरात माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी कडवे अाव्हान मोडीत काढत साखर कारखान्याची एकहाती सत्ता राखली. त्यामुळे सहकारात नागवडे, मुरकुटे यांची पकड कायम आहे.
नगरच्या सहकारावर नागवडे, मुरकुटेंची पकड
Nagwade, Murkute's grip on the co-operation of the Nagar

उस्मानाबाद : नगर ः जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी व श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अधिक चर्चेत राहिली. श्रीगोंद्यात राजेंद्र नागवडे, श्रीरामपुरात माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी कडवे अाव्हान मोडीत काढत साखर कारखान्याची एकहाती सत्ता राखली. त्यामुळे सहकारात नागवडे, मुरकुटे यांची पकड कायम आहे. 

साखर कारखान्यांचा जिल्हा अशी नगरची ओळख आहे. त्यामुळे साखर कारखान्याच्या निवडणुकीतील राजकारणावरच लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राजकारणाची गणिते ठरली जातात. श्रीगोंदा तालुक्यात एकाच वेळी कुकडी आणि नागवडे साखर कारखान्याची निवडणूक लागली. महिनाभरापूर्वी माजी आमदार राहुल जगताप यांनी कुकडी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवले. मात्र सहकारमहर्षी स्व. शिवाजीराव नागवडे यांनी उभारलेल्या साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध न होता तेथे माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, माजी उपाध्यक्ष केशव मगर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी कडवे अाव्हान उभे केले होते.

राजेंद्र नागवडे, दीपक नागवडे, जिल्हा बॅंकेच्या संचालक अनुराधा नागवडे यांच्या नियोजनातून निवडणूकात सर्व २१ जागा एकहाती जिंकत राजेंद्र नागवडेच किंगवमेकर ठरले. मगर, शेलार, बाळासाहेब नहाटा यांच्यासह आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांचाही पराभव झाला.  भानुदास मुरकुटे यांच्या अशोक कारखान्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले.

कारखाना स्थापनेपासून सत्त्ता असलेल्या मुरकुटे यांच्या विरोधात या निवडणूकीत शेतकरी संघटनेचे नेते ॲड. अजित काळे यांच्यासह मुरकुटे विरोधकांनी पॅनेल उभा केला. मुरकुटे यांच्या सून डॉ. वंदना मुरकुटे त्यांच्या विरोधात उभ्या होत्या. मात्र दोन ते आडीच हजार मताच्या फरकाने मुरकुटे यांचे २१ उमेदवार जिंकले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.