पीक पेरा नोंदणीत नांदेड मराठवाड्यात अव्वल

नांदेड : ‘‘ई पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांचा पेरा ऑनलाइन नोंदला आहे. यात मराठवाड्यात नांदेड अव्वल ठरले आहे.
Nanded tops Marathwada in crop sowing registration
Nanded tops Marathwada in crop sowing registration

नांदेड : ‘‘ई पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांचा पेरा ऑनलाइन नोंदला आहे. यात मराठवाड्यात नांदेड अव्वल ठरले आहे. पेरा नोंदणीची मुदत दोन दिवसात संपत आहे. त्यामुळे शिल्लक शेतकऱ्यांनी लवकर नोंदणी करावी’’, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी केले.

राज्य सरकारने यावर्षी ई-पीक पाहणी अ‌ॅप सुरु करून पीक पेरा नोंदणीचा कार्यक्रम शेतकरी स्तरावर राबविण्याचा निर्णय घेतला. महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. या पीक पाहणीची सुरवात १५ ऑगस्टला झाली.

या काळात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे नोंदणीच्या कामाला गती आली नाही. त्यामुळे प्रारंभी ३० सप्टेंबरपर्यंत, तर यानंतर १४ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. 

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत १९ लाख ६२ हजार ६४ पेरा नोंदणी झाली आहे. नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत तीन लाख ५२ हजार ६९१ नोंदी झाल्या आहेत. या नोंदणी मराठवाड्यात सर्वाधिक आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर लातूर व तिसऱ्या स्थानी उस्मानाबाद जिल्हा आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरा नोंदणीला प्रतिसाद दिल्याबद्दल डॉ. विपिन यांनी समाधान व्यक्त केले. उर्वरित शेतकऱ्यांनी दोन दिवसात नोंदणी करावी, असे आवाहन  त्यांनी केले. 

मराठवाड्यातील नोंदी

नांदेड - ३,५२,६९१, लातूर - ३,०३,०७०, उस्मानाबाद - २,५६,०३८, जालना - २,४०,६१२, बीड - २,३५,०८२, औरंगाबाद - २,१६,७७८, हिंगोली - १,८७,१६३, परभणी - १,४०,६३०.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com