बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून पदाधिकाऱ्यांच्या निवडी

राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील विधानसभाध्यक्ष, तालुका, शहर व कार्याध्यक्ष पदांवरील व्यक्तींच्या निवडी जाहीर केल्या
From NCP in Buldana district Elections of office bearers
From NCP in Buldana district Elections of office bearers

बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील विधानसभाध्यक्ष, तालुका, शहर व कार्याध्यक्ष पदांवरील व्यक्तींच्या निवडी जाहीर केल्या. जिल्हा प्रभारी डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांनी नावे जाहीर केली.  जिल्ह्यातील प्रत्येक तालुका निरीक्षक यांनी संबंधित तालुक्यात बैठक घेत इच्छुकांची नावे घेतली होती. त्यानंतर डॉ. शिंगणे यांच्या उपस्थित निवड मंडळाची बैठक पार पडली. यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक बदल करणे अपेक्षित होते. त्या अनुषंगाने काहींना कायम ठेवले असून, काही पदाधिकाऱ्यांना शासकीय समितीत स्थान देण्यात आले आहे. यात विधानसभा अध्यक्षपदी संतोष रायपुरे (मलकापूर), प्रकाश ढोकणे (जळगाव जामोद), पुंजाजी टिकार (खामगाव), नरेश शेळके (बुलडाणा) प्रमोद पाटील (चिखली), पुरुषोत्तम पडघान (मेहकर), गजानन पवार (सिंदखेडराजा). तालुकाध्यक्षपदी रामराव लाहुडकर (मलकापूर), नांदुरा संजय दयाराम चोपडे (अध्यक्ष) विनायक मुऱ्हे (कार्याध्यक्ष), जळगाव जामोद प्रमोद सपकाळ (अध्यक्ष) महादेव भालतडक (कार्याध्यक्ष), संग्रामपूर संजय मारोडे (अध्यक्ष) अरुण निंबोळकर (कार्याध्यक्ष), शेगाव संजय गव्हांदे (अध्यक्ष) राजू पाटील (कार्याध्यक्ष), चिखली दीपक म्हस्के, बुलडाणा प्रा. डी.एस. लहाने, मोताळा यशवंत धाबे, मेहकर दत्तायत्र घनवट (अध्यक्ष) यासीन बेग (कार्याध्यक्ष), लोणार सदानंद तेजनकर, सिंदखेडराजा सतीश काळे, देऊळगावराजा उद्धवराव म्हस्के (अध्यक्ष) नितीन शिंगणे (कार्याध्यक्ष), खामगाव अंबादास हिंगे पाटील. शहराध्यक्षपदी मलकापूर अरुण अग्रवाल, नांदुरा नितीन मानकर (अध्यक्ष) कलीम परवेज (कार्याध्यक्ष), जळगाव जामोद अजहर देशमुख (अध्यक्ष) संजय ढगे (कार्याध्यक्ष), संग्रामपूर तुकाराम घाटे (अध्यक्ष), शेख सरदार (कार्याध्यक्ष), शेगाव दिनेश साळुंके (अध्यक्ष), रामेश्‍वर ताकोते (कार्याध्यक्ष), खामगाव देवेंद्र देशमुख (अध्यक्ष), अ‍ॅड. मो. आरिफ (कार्याध्यक्ष), चिखली रवींद्र तोडकर (अध्यक्ष) रहीमखान पठाण (कार्याध्यक्ष), बुलडाणा अनिल बावस्कर, मोताळा प्रमोद कळसकर, मेहकर निसार अन्सारी, लोणार तौसीफ अली, सिंदखेडराजा सीताराम चौधरी, देऊळगावराजा अ‍ॅड. अर्पित मिनासे (अध्यक्ष) सय्यद करीम (कार्याध्यक्ष) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com