
अकोला ः कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर, पशू आणि मानव यांच्यातील सामायिक रोगांचा फैलाव लक्षात घेता, पशुंमध्ये वारंवार उद्भवणाऱ्या विविध रोगांचे वेळीच निदान व अनुरूप औषधोपचारासाठी पशुवैद्यकांनी नवतंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन दुर्ग येथील वासुदेव चंद्रकर कामधेनू विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. डॉ. नारायण दक्षिणकर यांनी केले.
‘माफसू’च्या अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्थेच्या वतीने आभासी राष्ट्रीय पशुवैद्यकीय परिषद घेण्यात आली. याचे उद्घाटन डॉ. दक्षिणकर यांच्या हस्ते करण्यात आले. ‘पशुवैद्यक क्षेत्रातील वारंवार उद्भवणाऱ्या रोगांचे निदान आणि औषधोपचारामधील नवनवीन पद्धती’ या विषयावर ही राष्ट्रीय परिषद झाली. या प्रसंगी शिक्षण संचालक व अधिष्ठाता प्रा. डॉ. एस. व्ही. उपाध्ये, शिक्षण विस्तार संचालक प्रा. डॉ. ए. यू. भिकाने यांची उपस्थिती होती. आयोजन समितीचे अध्यक्ष सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. धनंजय दिघे यांनी परिषदेच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली.
प्रास्ताविक सचिव डॉ. किशोर पजई यांनी केले. तीन दिवस चाललेल्या या परिषदेत पशुऔषध उपचारशास्त्र, पशू शल्यचिकित्सा व क्ष-किरण शास्त्र, पशुप्रजनन व प्रसूती शास्त्र आणि पशुरोगनिदान शास्त्र इत्यादी विषयावर मार्गदर्शन झाले. समारोप प्रसंगी डॉ. सुनील वाघमारे यांनी अहवाल वाचन करून परिषदेचा वृत्तांत सादर केला.
या परिषदेत महाराष्ट्रासह इतर राज्यांतील सहभागी एकूण २८४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. १०२ स्नातकपूर्व पदवी विद्यार्थी आणि १०७ स्नातकोत्तर पदवी विद्यार्थी यांनी आपले पशुचिकित्सालयीन संशोधन सादर केले. आयोजक सहसचिव डॉ. महेश इंगवले यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला.
स्पर्धेतील विजेते विद्यार्थी याप्रमाणे
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.