कृषी शिक्षणाच्या नवीन  धोरणासाठी समिती स्थापन

राज्यातील कृषी प्रवेशप्रक्रिया व कृषी शिक्षणाचे नवीन धोरण निश्‍चित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कृषी प्रवेश प्रक्रिया व आगामी कृषी शिक्षण धोरणा संदर्भात नुकतीच बैठक झाली.
कृषी शिक्षणाच्या नवीन  धोरणासाठी समिती स्थापन New to agricultural education Establishment of a committee for policy
कृषी शिक्षणाच्या नवीन  धोरणासाठी समिती स्थापन New to agricultural education Establishment of a committee for policy

नगर : राज्यातील कृषी प्रवेशप्रक्रिया व कृषी शिक्षणाचे नवीन धोरण निश्‍चित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कृषी प्रवेश प्रक्रिया व आगामी कृषी शिक्षण धोरणा संदर्भात नुकतीच बैठक झाली. त्यानुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष पुरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित झाली आहे. 

महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील विविध पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी, या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात व कृषी शिक्षणाचे धोरण निश्‍चित करण्यासाठी शासनास अहवाल सादर केला होता. त्यानुसार नुकतीच बैठक झाली आहे. त्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणाचे धोरण निश्‍चित करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष पुरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. चारही विद्यापीठांचे मनुष्यबळ वापरून, तसेच महसुली उत्पन्नातून समसमान खर्च विभागून या समितीला येत्या दोन महिन्यांमध्ये कृषी शिक्षण व कृषी प्रवेश प्रक्रियेबद्दलचा अहवाल शासनास सादर करावयाचा आहे. 

राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये असलेली रिक्त पदे, प्राध्यापकांची कमी संख्या, कंत्राटी प्राध्यापक भरती, या अनुषंगाने विद्यापीठांची कामगिरी सुमार दर्जाची बनली आहे. राज्यातील खासगी कृषी महाविद्यालयांमध्ये देखील विद्यार्थ्यांना भारतीय कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा करणे गरजेचे आहे. अनेक सोयी-सुविधांचा अभाव दिसून येत आहे. कृषी विद्यापीठाच्या यंत्रणेवर खासगी कृषी महाविद्यालयांचे ओझे डोईजड झालेले आहे. या अनुषंगाने खासगी कृषी महाविद्यालये, त्यांच्या प्रवेश प्रक्रिया, तसेच कृषी शिक्षणाचे नवे धोरण आखण्यासाठी शासनाने पाऊल उचलल्याचे दिसत आहे. 

अशी आहे समिती  अध्यक्ष डॉ. सुभाष पुरी (माजी कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ), सदस्य सचिव डॉ. अशोक फरांदे (अधिष्ठाता व अध्यक्ष शिक्षण संचालक समन्वय समिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) सदस्य ः डॉ. शंकरराव मगर (माजी कुलगुरू, डॉ.. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ), डॉ. डी. एल. साळे (माजी अधिष्ठाता, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला). डॉ. विलास पाटील (माजी अधिष्ठाता, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ) आणि डॉ. सतीश नारखेडे (अधिष्ठाता, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com