गुजरातमध्ये पुढील सरकार काँग्रेसचेच

गुजरातमध्ये पुढील सरकार काँग्रेसचेच
गुजरातमध्ये पुढील सरकार काँग्रेसचेच

अहमदाबाद : गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला तोडीस तोड लढत दिल्याबद्दल पक्षकार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यात पुढील सरकार आपला पक्षच स्थापन करेल, असा आत्मविश्‍वास शनिवार (ता. २३) येथे व्यक्त केला.  विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गुजरातमध्ये नवे नेतृत्व उदयाला आल्याचे पाहायला मिळाले, असे सांगून राहुल यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संधी हुकली असली तरी राज्यात पुढील सरकार आपणच स्थापन करु. पुढील निवडणुकीत काँग्रेस १३५ जागा जिंकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.   गुजरात निवडणुकीदरम्यान काही लोकांनी पक्षाच्या विरोधात काम केले असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे सूतोवाचही राहुल यांनी केले. ते म्हणाले, की ९० टक्के लोकांनी एकत्रितपणे लढत दिली आणि त्याचा निवडणुकीत काँग्रेससाठी चांगला परिणाम दिसून आला. मात्र, ५ ते १० टक्के लोकांनी काहीच मदत केली नाही. पक्ष त्यांच्याविरुद्ध कारवाई करेल.  राहुल म्हणाले, की निवडणुकीचे निकाल काहीही लागले असले तरी काँग्रेससाठी हा एक विजय आहे. कारण, पक्षाने निवडणूक लढविण्यासाठी सत्य आणि प्रेमाचा शस्त्र म्हणून वापर केला. जर काँग्रेस एकजूट होऊन उभी राहिली तर ती पराभूत होत नाही. निवडणुकीत आपला पराभव झाला. मात्र, आपण जिंकलो, कारण ते द्वेषाने लढले आणि त्यांच्याजवळ सर्व सामग्री होती. गेल्या वीस वर्षांत भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांविरुद्ध मानहानीचा प्रचार चालविल्यामुळे आपण पराभूत झालो. पुढील पाच वर्षे भाजप गुजरातसाठी काम करेल आणि आपण विरोधकांची भूमिका बजावू, असेही राहुल म्हणाले. भूपेंद्र कांत यांचा काँग्रेसला पाठिंबा गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या तीन अपक्ष आमदारांपैकी भूपेंद्र कांत यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. भूपेंद्र यांनी काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला. भूपेंद्र हे काँग्रेसच्या दिवंगत आमदार सविता कांत यांचे चिरंजीव आहेत. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com