निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात विसर्ग सुरू

परभणी ः दुधना नदीकाठच्या गावातील पाणीटंचाई निवारणासाठी निम्न दुधना प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले. येथून शुक्रवारी (ता.२८) सकाळी साडेनऊ वाजता दुधना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला.
From the Nimna Dudhana Project water flow continues in the river basin

शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता निम्न दुधना प्रकल्पाच्या जलाशयातील पाणी पातळी ४२४.४१० मीटर होती. प्रकल्पाचे द्वार क्रमांक १ व २०, २ व १९ हे चार द्वारे ०.२० मीटरने तसेच द्वार क्रमांक ३ व १८ हे ०.१० मीटरने उघडण्यात आले.  एकूण ३०५६ क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

दुधना नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. नदीपात्रात उतरू नये. तसेच गुरेढोरे, इतर तत्सम प्राण्यांना नदीपात्रात उतरू देऊ नये. शेती अवजारे, विद्युत पंप लागलीच काढून घ्यावेत. मोरगाव, इरळद, नांदगाव, झरी, सनपुरी बंधाऱ्याच्या फळ्या  काढून घेण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने करावी, असे निर्देश सेलू येथील निम्न दुधना पाटबंधारे उपविभाग क्रमांक २ चे उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com