मॉन्सून हंगामात राज्यात १९ टक्के अधिक पाऊस

कोकण, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात सरासरी इतक्या पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
मॉन्सून हंगामात राज्यात १९ टक्के अधिक पाऊस
मॉन्सून हंगामात राज्यात १९ टक्के अधिक पाऊस

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात (१ जून ते ३० सप्टेंबर) राज्यात ११९४.३ मिलिमीटर (१९ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली आहे. कोकण, मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात सरासरी इतक्या पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

दुष्काळी मराठवाड्यात यंदा दमदार पाऊस कोसळला. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात मात्र काहीसा कमी पाऊस पडल्याचे दिसून आले आहे. मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, परभणी, बीड जिल्ह्यांत सर्वाधिक पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील सांगली, नंदूरबार, विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत पावसाने कशीबशी सरासरी गाठली आहे. जून, जुलैमधील खंड आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेल्या ओढीनंतरही सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक धरणे ओसंडून वाहिली आहेत. 

सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात सरासरी १००४.२ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा चांगल्या पावसाने हजेरी लावल्याने ११९४.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोकणात ३५५९.८ मिलिमीटर (२४ टक्के अधिक), मध्य महाराष्ट्रात ८७२.६ मिलिमीटर (१६ टक्के अधिक), मराठवाड्यात ९८८.५ मिलिमीटर (४८ टक्के अधिक), तर विदर्भात ९६८.९ मिलिमीटर (३ टक्के अधिक) पावसाची नोंद झाली आहे. 

मराठवाड्यात दमदार पाऊस  जिल्हानिहाय पडलेल्या पावसाची विचार करता, यंदा हिंगोली वगळता मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत दमदार पाऊस पडला आहे. जालना जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला असून, तेथे सरासरीपेक्षा ८२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ परभणी जिल्ह्यात ६५ टक्के अधिक, बीड जिल्ह्यात ६७ टक्के, औरंगाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा ६३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. कोकणातील रायगड वगळता सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली. तसेच गडचिरोली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत १३ टक्के कमी, तर सांगली जिल्ह्यात १२ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. 

मॉन्सून हंगामात (१ जून ते ३० सप्टेंबर) राज्यातील विभागनिहाय पडलेला पाऊस 

विभाग सरासरी पडलेला टक्केवारी 
कोकण २८७५.३ ३५५९.८ २४ 
मध्य महाराष्ट्र ७५१.२ ८७२.६ १६
मराठवाडा ६६८.८ ९८८.५ ४८ 
विदर्भ ९४३.१ ९६८.९ ३ 

देशात ९९ टक्के पावसाची नोंद  यंदाच्या मॉन्सून हंगामात देशातही सामान्य पावसाने हजेरी लावली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात पडणाऱ्या पावसाची सरासरी ८८०.६ मिलिमीटर आहे. या वर्षी देशात ८७४.६ टक्के पावसाची (१ टक्का कमी) नोंद झाली आहे. देशात राजधानी दिल्ली, हरियाना, तेलंगणा राज्यांत आणि अंदमान निकोबार बेट समूहावर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. तर ईशान्य भारतात यंदा पावसाने ओढ दिली असून, मणिपूर राज्यात सर्वांत कमी (उणे ६० टक्के) पाऊस पडला. आसाम, अरुणाचल, नागालॅण्ड, मेघालय, मिझोराम राज्यातही खूपच कमी पाऊस पडला आहे. उत्तरेकडील लडाख, जम्मू-काश्मीर राज्य आणि लक्षद्वीप बेटसमूहावर पावसाने ओढ दिली असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

गुलाब चक्रीवादळ अन् १२ प्रणालींची निर्मिती  यंदाच्या मॉन्सून हंगामात गुलाब हे एक चक्रीवादळ आले. तसेच एका वादळी प्रणालीसह (डीप डिप्रेशन) आणखी ११ कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली. यात जून आणि ऑगस्ट महिन्यांत प्रत्येकी दोन, जुलै महिन्यात चार कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ५ प्रणाली तयार झाल्या. यात 'गुलाब' चक्रीवादळ, एक वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन), तीन कमी दाब क्षेत्रांची निर्मिती झाली. 

देशातील मॉन्सूनची वैशिष्ट्ये 

  • जून, जुलै महिन्यांत मोठे खंड, ऑगस्टमध्ये सर्वांत कमी, सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस 
  • जून महिन्यात ११० टक्के, जूलै ९३ टक्के, ऑगस्ट ७६ टक्के, तर सप्टेंबर महिन्यात १३५ टक्के पावसाची नोंद. 
  • वायव्य भारतात ९६ टक्के, मध्य भारत १०४ टक्के, पूर्व आणि ईशान्य भारत ८८ टक्के, दक्षिण भारत १११ टक्के पाऊस 
  • मॉन्सून हंगामात (१ जून ते ३० सप्टेंबर) राज्यात जिल्हानिहाय पडलेला पाऊस : 

    जिल्हा सरासरी पडलेला टक्केवारी 
    मुंबई शहर २०२१.४ २०६१.१
    पालघर २३०५.४ २७७६.६ २०
    रायगड ३१४८.७ ३६५०.६ १६
    रत्नागिरी ३१९५.१ ४२४४.९ ३३
    सिंधुदुर्ग २९४०.५ ३८९६.२ ३३
    मुंबई उपनगर २२०५.८ ३१६३.५ ४३
    ठाणे २४३३.४ २९७४.९ २२
    नगर ४४८.१ ५८२.२ ३०
    धुळे ५३५.१ ७३०.३ ३६
    जळगाव ६३२.६ ७९०.७ २५
    कोल्हापूर १७३३.१ २०३९.७ १८
    नंदूरबार ८६०.४ ८११.८ उणे ६
    नाशिक ९३३.८ ११३०.० २१
    पुणे ८६१.५ ८९३.७
    सांगली ५१४.५ ४५१.५ उणे १२
    सातारा ८८६.२ १०३७.५ १७
    सोलापूर ४८१.१ ५९६.५ २४
    औरंगाबाद ५८१.८ ९४७.७ ६३
    बीड ५६६.१ ९४५.२ ६७
    हिंगोली ७९५.३ ८६१.६
    जालना ६०३.१ १०९४.९ ८२
    लातूर ७०६.० ९२५.९ ३१
    नांदेड ८१४.३ १०६१.७ ३०
    उस्मानाबाद ६०३.१ ८१२.६ ३५
    परभणी ९०६.१ १२५२.६ ६५
    अकोला ६९३.८ ७२३.४
    अमरावती ८६२.० ८००.४ उणे ७
    भंडारा ११५७.० १११७.७ उणे ३
    बुलडाणा ६५९.४ ६९९.४
    चंद्रपूर १०८३.९ १११२.३
    गडचिरोली १२५४.२ १०८७.२ उणे १३
    गोंदिया १२२०.२ ११२९.६ उणे ७
    नागपूर ९२०.४ १०५३.२ १४
    वर्धा ८७४.५ ९५७.१
    वाशीम ७८९.० ९७४.४ २३
    यवतमाळ ८०५.० १००९.९ २४

    प्रतिक्रिया... मॉन्सून हंगामात देशभरात यंदा ८७ सेमी (९९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वांत कमी (७६ टक्के) तर सप्टेंबरमध्ये सर्वाधिक (१२३ टक्के) पाऊस झाला आहे. सप्टेंबरमधील हा आतापर्यंतचा दुसरा सर्वाधिक नोंदविला गेलेला पाऊस आहे. हंगामात १३ कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाली. त्यात सप्टेंबरमध्ये सर्वांत जास्त पाच क्षेत्र व गुलाब चक्रीवादळाची निर्मिती झाल्याने सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला.  - डॉ. मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, हवामान विभाग 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com