राज्यात आज हलक्या सरींची शक्यता 

राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता.३) कोकणात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
Hawaman
Hawaman

पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता.३) कोकणात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरीसह, मुख्यतः पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाबाचे क्षेत्र उत्तर प्रदेश आणि परिसरावर असून, ते मध्य प्रदेश आणि राजस्थानकडे सरकत जाण्याची शक्यता आहे. हरियाना आणि परिसरावरही हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून, संगरूर, दिल्ली, सिधी, गया, मालदा ते त्रिपूरा, उत्तर बांगलादेशपर्यंत सक्रिय आहे. बांगलादेशाच्या उत्तर भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती सक्रिय असल्याने या भागात पावसासाठी पोषक वातावरण आहे. 

दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे उत्तर भारतात मॉन्सून सक्रिय राहणार आहे. तर दक्षिण भारतात मात्र पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. उद्या (ता.४) महाराष्ट्रातील कोकणात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पावसाला पोषक हवामान नसल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींसह पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  येथे होणार जोरदार पाऊस  मंगळवार ः ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण राज्यात तुरळक  बुधवार ः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण राज्यात तुरळक  गुरुवार ः रायगड, रत्नागिरी, संपूर्ण राज्यात तुरळक  शुक्रवार ः संपूर्ण राज्यात तुरळक  राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोमवारी (ता.२) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) कंसात सरासरीच्या तुलनेत झालेली वाढ : 

  • पुणे - २७.८ (०.२) 
  • जळगाव - ३१.८ (०.२) 
  • कोल्हापूर - २६.८ (०.४) 
  • महाबळेश्वर - १९.० (-०.५) 
  • मालेगाव - ३०.८ (०.९) 
  • नाशिक - २६.९ (-०.९) 
  • सांगली - २६.३ (-२.१) 
  • सातारा - २६.० ( -०.४) 
  • सोलापूर - ३१.३ (०.१) 
  • मुंबई (कुलाबा) - ३०.४ (०.६) 
  • अलिबाग - ३०.२ (०.५) 
  • रत्नागिरी - २९.४ (०.९) 
  • डहाणू - ३१.१ (१.०) 
  • औरंगाबाद - २९.५ (०.३) 
  • परभणी - ३०.४ (-०.३) 
  • नांदेड- ३३.० (१.७) 
  • अकोला - ३१.४ (०.५), 
  • अमरावती - २८.४ (-१.८) 
  • बुलडाणा - २८.० (-०.१) 
  • ब्रम्हपुरी - २८.९ (-१.८) 
  • चंद्रपूर - ३०.८ (-०.३) 
  • गोंदिया - २९.८ (-१.२) 
  • नागपूर - २९.३ (-१.५) 
  • वर्धा - २९.२ (-१.५) 
  • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    www.agrowon.com