लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस पे नोटीस’ 

येथील हिंसाचारप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्रा यांना नोटीस बजावतानाच शनिवारी अकरापर्यंत चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
'Notice Pay Notice' to Ashish Mishra
'Notice Pay Notice' to Ashish Mishra

लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष मिश्राला नोटीस बजावतानाच शनिवारी अकरापर्यंत चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

आशिष यांना आज सकाळी दहा वाजेपर्यंत चौकशीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते, पण त्यांनी या नोटिशीकडे दुर्लक्ष केले. यानंतर अजय मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, ‘‘आशिष उद्या (ता. ९) पोलिसांसमोर उपस्थित राहील त्यानंतर तो आपला जबाब आणि पुरावे देखील सादर करेल. तो निष्पाप आहे.’’ दुसरीकडे पोलिसांनी शुक्रवारी दुपारी पुन्हा अजय मिश्रा यांच्या घराबाहेर नोटीस लावली असून, त्यात त्यांना उद्यापर्यंत चौकशीला सामोरे न गेल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

आशिष यांनी याआधीच्या पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीला उत्तर दिले नव्हते, त्यामुळे ते नेपाळमध्ये पळून गेल्याच्या बातम्याही पसरल्या होत्या. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मिश्रा यांना नेपाळमध्ये पळून जाण्यापासून रोखायचे असेल तर तातडीने अटक करावी, असे म्हटले होते. 

किसान मोर्चा म्हणतो.. हे धक्कादायक  संयुक्त किसान मोर्चाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आशिष मिश्रा यांचा थांगपत्ता लागलेला नाही. वृत्तावाहिन्यांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या पाहिल्या तर ते त्यांचे ठिकाण बदलत असल्याचे दिसून येते. सध्या ते फरार असून उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक त्यांचा शोध घेते आहे. मिश्रा यांना आतापर्यंत अटक होत नसेल तर ते धक्कादायक आहे.

आमचा कायद्यावर पूर्ण विश्‍वास असून माझा मुलगा पूर्णपणे निर्दोष आहे. त्याला गुरुवारीच नोटीस मिळाली होती, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे चौकशीला उपस्थित राहता आले नाही. तो उद्या (ता. ९) चौकशीला सामोरा जाईल.  - अजय मिश्रा, केंद्रीय गृहराज्यमंत्री   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com