विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकरी संघटनेचा ठिय्या

सोलापूर ः शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता.२२) अचानक भारती एक्सा कंपनीच्या पुण्यातील कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला.
In the office of the insurance company Farmers' Association agitation
In the office of the insurance company Farmers' Association agitation

सोलापूर ः शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता.२२) अचानक भारती एक्सा कंपनीच्या पुण्यातील कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला. कंपनीचे व्यवस्थापक गोपाळ सोनवणे यांनी शेतकऱ्यांची कागदपत्रे घेत लवकरच खात्यावर विमा भरपाईची रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.  

मागील महिन्यात कंपनीच्या पुण्यातील कार्यालयात ‘झोपा’ व ‘मुक्काम’ आंदोलनानंतर काही शेतकऱ्यांचे पैसे मिळाले. तरीही अजूनही अनेक शेतकरी वंचित असल्याचे फोन सतत येत आहेत. त्यामुळे पंधरा जूनपासून आंदोलन करण्याचे निवेदन देताच कंपनीने भितीपोटी कार्यालय बंद ठेवले. मात्र, आतमध्ये गुपचूप कामकाज सुरू असल्याचे समजले. म्हणून अचानक येऊन आंदोलन केले, असे गायकवाड यांनी सांगितले.

दयानंद चौधरी, गोटू पाटील, पोपट चौधरी, बाळासाहेब भायगुडे, विठ्ठल पाटील, मनोज चौधरी, संदीप चौधरी, अमोल चौधरी, माणिक चौधरी, अरविंद चौधरी, बजरंग चौधरी, बाजीराव चौधरी, सूरज चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, लालासाहेब गायकवाड, दत्तात्रेय पाटील, संतोष गुंड, रूषिकेश गायकवाड, अंबरीष गायकवाड, विनोद गायकवाड, दीपक पाटील, प्रतिकेत गायकवाड, श्रीबाल गायकवाड, विकास गायकवाड, हनुमंत गायकवाड, शैलेंद्र पाटील आदी शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com