विमा कंपनीच्या कार्यालयात  मुक्काम ठोको आंदोलन 

मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर रोजी संपलेला आहे. तब्बल दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर विमा वर्ग करण्यासाठी विमा कंपनीकडून दिरंगाई होत आहे.
 विमा कंपनीच्या कार्यालयात  मुक्काम ठोको आंदोलन 
In the office of the insurance company Mukkam Thoko Andolan

जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर रोजी संपलेला आहे. तब्बल दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर विमा वर्ग करण्यासाठी विमा कंपनीकडून दिरंगाई होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एचडीएफसी एर्गो विमा कंपनीच्या जालना येथील कार्यालयात मंगळवारी (ता.३०) सुरू केलेले मुक्काम ठोको आंदोलन दुसऱ्या दिवशीही कायम होते.  मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर रोजी संपलेला आहे. तब्बल दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर विमा वर्ग करण्यासाठी विमा कंपनी दिरंगाई होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एचडीएफसी एर्गो विमा कंपनीच्या कार्यालयात मुक्काम ठोको आंदोलन मंगळवारी सुरू करण्यात आले.  स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील ११ हजार ८०० मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी एचडीएफसी एर्गो कंपनीकडे फळपीक विमा भरला होता. या मोसंबी फळपिकाचा ३८ कोटी २१ लाख ८६ हजार रुपये मंजूर झाले. मात्र अद्याप ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाहीत. त्यामुळे जोपर्यंत विमा मिळत नाही, तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही, अशी भूमिका घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांसह या कंपनी कार्यालयात मुक्काम आंदोलन छेडले आहे. मंगळवारच्या रात्री विमा कंपनी कार्यालयात मुक्काम करणाऱ्या स्वाभिमानीच्या नेतृत्वातील शेतकऱ्यांना शासनाचा हिस्सा मिळाला की विमा देऊ, असे उत्तर मिळत होते. किती हिस्सा बाकी आहे याचे उत्तर मात्र मिळत नव्हते, असे काळे यांनी सांगितले. 

कृषी अधीक्षकांना मिळाली नाहीत समाधानकारक उत्तरे  प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रणदिवे यांनी बुधवारी (ता. १) प्रत्यक्ष विमा कंपनी कार्यालयाला भेट दिली. त्यांनीही काही प्रश्‍नांची उत्तरे आमच्यासमक्ष विमा कंपनीच्या यंत्रणेला विचारले. परंतु त्यांनाही समाधानकारक उत्तर संबंधित यंत्रणा देऊ शकली नाही, असेही काळे यांनी सांगितले. जोवर विमा परतावा प्रश्‍न निकाली निघत नाही, तोवर आमचा मुक्काम कायम असेल, असेही काळे यांनी सांगितले. या मुक्काम आंदोलनात, घनसावंगी, जालना, अंबड या तीन तालुक्यांतील मोसंबी उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोसंबी विमा आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. एचडीएफसी एर्गो कंपनीचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, जय जवान जय किसान आदी घोषणांनी कंपनी कार्यालय दणाणून गेले होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com