गुहागरमध्ये दीडशे एकरातील  आंबा, काजू, नारळाच्या बागा खाक 

गुहागर, जि. रत्नागिरी : तालुक्यातील गिमवी देवघर परिसरात सुमारे १५० एकरात रविवारी (ता. २३) वणवा लागला. या वणव्यामध्ये १२ ते १३ शेतकऱ्यांच्या आंबा, काजू, नारळच्या बागा जळून खाक झाल्या.
 गुहागरमध्ये दीडशे एकरातील  आंबा, काजू, नारळाच्या बागा खाक 
One and a half hundred acres in Guhagar Khak mango, cashew, coconut orchards

गुहागर, जि. रत्नागिरी : तालुक्यातील गिमवी देवघर परिसरात सुमारे १५० एकरात रविवारी (ता. २३) वणवा लागला. या वणव्यामध्ये १२ ते १३ शेतकऱ्यांच्या आंबा, काजू, नारळच्या बागा जळून खाक झाल्या. दर वर्षी या भागात ३ वेळा वणवे लागतात. या समस्येचे निराकरण करण्यात स्थानिक जनता, प्रशासनाला यश आलेले नाही. 

रविवारी लागलेल्या सुमारे ३ किलोमीटर परिसरात पसरला होता. या वणव्यात प्रसाद निळकंठ जोशी यांच्या १८ एकर जागेतील ३५० काजू, अन्य शेतकऱ्यांचे १०० काजू जळून खाक झाले. एकूण १२ ते १३ शेतकऱ्यांच्या बागांचे या वणव्यात नुकसान झाले आहे. दर वर्षी येणारा हा वणवा येथील ग्रामस्थांसाठी सवयीचा बनला आहे. दिवाळीनंतर अनेक ग्रामस्थ आपल्या घराभोवतीचा इता काढतात. म्हणजे घराच्या कपांऊंडच्या बाजूने सुमारे १५ फूट जागेतील गवत बेणतात. त्यामुळे घर, परसाव वणव्यापासून सुरक्षित रहाते. 

येथील ग्रामस्थ समीर साळवी म्हणाले, ‘‘काही वेळ माळरानावरील वेगवान वाऱ्यामुळे वीजेच्या तारा एकमेकाला चिकटून होणाऱ्या स्पार्किंगमुळे वणवा लागतो. बहुतांश वेळा विडी सिगारेट ओढणारे रस्त्याच्या कडेला थोटूक टाकून जातात, त्याने वणवा लागतो. अपवादात्मक परिस्थितीत शेतकरी जागा साफ करण्यासाठी गवत जाळतात.

वाऱ्यामुळे आग अनियंत्रित झाल्यास वणवा लागतो. पण अशावेळी सदर शेतकऱ्याला ग्रामस्थ गुन्हेगार ठरवतात. त्यामुळे मनुष्यबळ सोबत घेतल्याशिवाय अशी आग लावण्याचे धाडस स्थानिक शेतकरी करत नाहीत. क्षेत्रीय वनाधिकारी राजश्री कीर म्हणाल्या, देवघर गिमवी परिसरात लागणारे वणवे खासगी जागेतील असून, मनुष्यनिर्मित आहेत. अशा वणव्यांमध्ये होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्याची तरतूदच नाही. वणवे रोखण्यासाठी घर परसावाप्रमाणे ग्रामस्थांनी रस्त्याच्या बाजूने असलेले गवत काढण्याची मोहीम राबवली पाहिजे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्थांनी जनजागृती करावी.’’

दोडामार्गमध्ये लागलेल्या आगीत  काजूची ३०० झाडे जळाली 

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील दोडामार्ग येथील गोवेकर कॉलनी येथे लागलेल्या आगीत उज्जला वासुदेव गोवेकर यांची ३०० हून अधिक काजूची झाडे जळाली आहेत. हा प्रकार रविवारी (ता. २३) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याच्या अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग येथील गोवेकर कॉलनी परिसरातील माळरानाला आग लागली. सुकलेले गवत आणि वारा यामुळे आगीचा भडका उडाला. ही आग अवघ्या काही मिनिटांत गोवेकर यांच्या काजू बागेत घुसली. ही आग विझविण्याचा स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न केला परंतु ते शक्य झाले नाही. या आगीत ३०० हून अधिक काजूची झाडे, पाण्याची तीनशे मीटर जलवाहिनी, केरोसीन पंप देखील या आगीत जळाले. त्यांचे सुमारे पाच लाखांहून अधिक नुकसान झाले आहे.

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज होता. या प्रकारानंतर महावितरणचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नुकसानीचा पंचनामा केला आहे. गोवेकर यांची सर्व झाडे उत्पादनक्षम आहेत. या झाडांना चांगला मोहोर आणि काही झाडांना फळधारणा झालेली आहे. अशा स्थितीत बाग जळाल्यामुळे या वर्षीचे पूर्ण उत्पादन वाया गेले आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.