कोल्हापूर जिल्ह्यात एक लाखावर शेतकरी वीजबिल थकबाकीमुक्त

कोल्हापूर ः ‘‘कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून मूळ थकबाकीमध्ये सुमारे ६६ टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यातील ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठीची मुदत येत्या ३१ मार्चपर्यंत आहे.
One lakh farmers in Kolhapur district are free from electricity bill arrears
One lakh farmers in Kolhapur district are free from electricity bill arrears

कोल्हापूर ः ‘‘कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून मूळ थकबाकीमध्ये सुमारे ६६ टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यातील ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठीची मुदत येत्या ३१ मार्चपर्यंत आहे. जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ५५२ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. त्यातील ७३ हजार १३२ शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेत वीजबिल कोरे केले आहे’’, अशी माहिती पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली.

जिल्ह्यातील १ लाख ४६ हजार ६०९ शेतकऱ्यांकडे एकूण ४७९ कोटी ४५ लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. त्यातील महावितरणकडून निर्लेखन तसेच व्याज व दंड माफी आणि वीजबिल दुरुस्तीनंतर समायोजनेतून या शेतकऱ्यांकडे आता ३९१ कोटी २८ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यातील ५० टक्के रक्कम येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी म्हणजे १९५ कोटी ६४ लाख रुपये माफ होतील. 

आतापर्यंत थकबाकी व चालू वीजबिलापोटी शेतकऱ्यांनी १७३ कोटी ९२ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी एकूण १२७ कोटी ९८ लाख रुपये माफ झाले आहेत. यामध्ये ७३ हजार १३२ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम असा एकूण १११ कोटी ७५ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्ये त्यांना आणखी ७७ कोटी १८ लाख रुपयांची सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली.

कृषिपंपांच्या थकीत व चालू वीजबिलांच्या भरण्यामधून एकूण १३९ कोटी ६४ लाख रुपये कृषी आकस्मिक निधीमध्ये जमा झाले आहेत. 

२१४६ कामांचे अंदाजपत्रक मंजूर 

जिल्ह्यात ४२ कोटी ४४ लाख रुपये खर्चाच्या २१४६ विविध कामांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. कृषी आकस्मिक निधीमधून आतापर्यंत १० कोटी २८ लाख रुपये खर्चाचे १५६६ कामे सुरू करण्यासाठी कामाचा आदेश देण्यात आला आहे. त्यातील १२३० कामे प्रगतिपथावर आहे. तर, ३३६ विविध कामे पूर्ण झाली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com