नगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवड

नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला शेतकऱ्यांनी अधिक प्राधान्य दिले आहे. यंदा आतापर्यंत सुमारे १ लाख ५१ हजार २७३ हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे.
नगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवड
Onion cultivation on 1.5 lakh hectares in the town

नगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला शेतकऱ्यांनी अधिक प्राधान्य दिले आहे. यंदा आतापर्यंत सुमारे १ लाख ५१ हजार २७३ हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे. पारनेर तालुक्यात सर्वाधिक २९ हजार ७१० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. अलीकडच्या  काही वर्षांतील नगर जिल्ह्यातील ही विक्रमी लागवड आहे. 

जिल्ह्यात साधारण सात ते आठ वर्षापासून कांद्याचे उत्पादन घेण्याला प्राधान्य दिले आहे. गेल्या दोन वर्षांत अति पाऊस, रोगाचा प्रादुर्भाव, दरात चढ-उतार आणि कोरोना अशा अनेक संकटांतून कांद्याचे नुकसान झाले. तरीही नगदी पीक म्हणून अलीकडच्या काळात कांदा उत्पादनाला नगर जिल्ह्यात प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहेत. मात्र यंदा काही महिन्यापासून कांद्याचे दर साधारणपणे अडीच ते तीन हजारांवर स्थिर आहेत. 

यंदा पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी असल्याने आतापर्यंत यंदा कांद्याची १ लाख ५१ हजार २७३ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून, हा आकडा पावणेदोन लाखाच्या जवळपास होण्याची अंदाज व्यक्त केला जात आहे. पारनेरसह अन्य तालुक्यात यंदा कांदा लागवड अधिक आहे. जिल्ह्यात अलीकडे कांद्याची सर्वाधिक लागवड आहे.  

तालुकानिहाय कांदा लागवड (हेक्टरमध्ये) ः नगर ः २५,८२१, पारनेर ः २९,७१०, श्रीगोंदा ः ११,१४१, कर्जत ः १७,१८६, जामखेड ः २४१०, शेवगाव ः ३८५९, पाथर्डी ः ११,६५२, नेवासा ः ८,४५८, राहुरी ः ९,७६१, संगमनेर ः ८,१६९, अकोले ः ५०९, कोपरगाव ः १०,३५४, श्रीरामपूर ः ९,१०७, राहाता ः ३,१३६.

  बियाणे फसवणुकीकडे दुर्लक्ष  नगर जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात बियाण्यांत फसवणुकीचे अनेक प्रकार घडले. यंदाही वाटाणा, सोयाबीन, कांद्याच्या बियाण्यांत फसवणूक झाल्याच्या तक्रारी आल्या. कर्जतमध्ये डाळिंबावर फवारणी केल्या जाणाऱ्या कीटकनाशकात फसवणूक झाली. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा गुणनियंत्रण यांच्याकडून कार्यवाही होणे गरजेचे होते. मात्र कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी त्याकडे कृषी विभागाने दुर्लक्ष केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.