कांदा हीच आमची लक्ष्मी...

बाहेरचा कांदा देशात नको, आपला कांदा पूर्ण देशाला पुरेल इतका असताना असा अट्टहास कशासाठी? हवे तर सरकारने कांदा खरेदी करत रेशनवर ग्राहकांना द्यायला हवा, कांदा हीच आमची खरी लक्ष्मी आहे.
onion worship
onion worship

निफाड, जि. नाशिक : बाहेरचा कांदा देशात नको, आपला कांदा पूर्ण देशाला पुरेल इतका असताना असा अट्टहास कशासाठी? हवे तर सरकारने कांदा खरेदी करत रेशनवर ग्राहकांना द्यायला हवा, कांदा हीच आमची खरी लक्ष्मी आहे. सरकारला शेतकरीपूरक निर्णय घेण्याची बुद्धी दे, असे साकडे घालत नैताळे (ता. निफाड) येथील कांदा उत्पादक संजय साठे यांनी सपत्नीक कांद्याचीच पूजा करीत लक्ष्मीपूजन केले.  सध्या देशात कांदा चर्चेचा विषय, पण मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदाच आमची लक्ष्मी. यावरच आमचे कुटुंब अवलंबून आहे, असे सांगत स्वतः पिकविलेल्या कांद्याचेच लक्ष्मीपूजनाला नैताळेचे शेतकरी संजय साठे आणि त्यांच्या पत्नी शोभा साठे या दांपत्याने शनिवारी (ता. १४) पूजन करत केंद्र सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली.  गेल्या काही वर्षांत सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांचे मरण ठरत आहे. आधीच तीन वर्षांपासून दुष्काळ आणि अतिवृष्टीचा फटका शेती आणि शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच केंद्र सरकारच्या निर्णयाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडते आहे.  गत वर्षीही संजय साठे यांनी आपल्या मातीमोल विकलेल्या कांद्याची पंतप्रधानांना मनीऑर्डर केली होती. शनिवारी पुन्हा शेतकरीवर्गाच्या व्यथा सरकारदरबारी पोहोचाव्यात म्हणून आपल्या कांदाचाळीला सजवून साठे दांपत्याने कांद्यांची विधिवत पूजा करत सरकारला शेतकरीवर्गासाठी पूरक निर्णय घेण्याची बुद्धी दे, बाहेरचा कांदा देशात नको, आपला कांदा पूर्ण देशाला पुरेल इतका असताना असा अट्टहास कशासाठी? हवे तर सरकारने कांदा खरेदी करत रेशनवर ग्राहकांना द्यायला हवा, अशी या वेळी मागणी केली.

प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी महागडे बियाणे घेत कांद्याचे पीक घेतले. मात्र त्या पिकाला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. जे पीक हातात आले, ते शासनाच्या निर्णयामुळे मातीमोल विकण्याची वेळ आली आहे. तरी शासनाने शेतकऱ्यांचा गांभीर्याने विचार करावा, यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही कांद्याचे पूजन केले. -संजय साठे, कांदा उत्पादक, नैताळे, ता. निफाड

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com