खानदेशात कांद्याच्या दरात सुधारणा

जळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-पाच दिवसांत सुधारणा झाली. कमाल दर १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. किमान दरही ८०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.
Onion price improvement in Khandesh
Onion price improvement in Khandesh

जळगाव ः  खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-पाच दिवसांत सुधारणा झाली. कमाल दर १५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. किमान दरही ८०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. 

दरात सुधारणा होत असतानाच आवकेत मात्र गेले सात-आठ दिवस घट दिसून आली. कांद्यासाठी खानदेशात धुळे, साक्री (ता. धुळे), अडावद (ता. चोपडा), जळगाव, चाळीसगाव येथील बाजार प्रसिद्ध आहेत. या बाजारांमध्ये कांद्याची आवक गेले तीन दिवस सरासरी पाच हजार क्विंटल सरासरी एवढी राहिली.

गेल्या पंधरवड्यात प्रतिदिन सरासरी सहा हजार क्विंटल आवक या बाजार समित्यांमध्ये झाली. अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील कांद्याची मे महिन्यात सुरवातीला किंवा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बाजारात विक्री केली. 

कांद्याला सुरवातीपासून उचल होती. एप्रिलमध्येही कोविडमुळे लॉकडाऊनची समस्या होती. यामुळे या काळात काही खरेदीदार, व्यापाऱ्यांनी थेट शेतातून कांद्याची उचल केली. सध्या शेतकऱ्यांकडे फारसा कांदा शिल्लक नाही. परंतु काही शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करून कांदा चाळीत साठवणूक केली. यामुळे त्यांना सध्या दरवाढीचा लाभ मिळत आहे. 

पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घट

जळगाव बाजार समितीमध्ये आठवडाभरात प्रतिदिन सरासरी ७०० क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. लाल कांद्याचीच अधिक आवक आहे. पांढऱ्या कांद्याची तोकडी आवक होत आहे. जळगावच्या बाजारात यावल, चोपडा, जळगाव, जामनेर, औरंगाबादमधील सोयगाव येथूनही कांद्याची आवक होत आहे. ही आवक पुढे आणखी कमी होईल, असे सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com