गेल्या वर्षीच्या तुलनेत सव्वातीन हजारांनी यंदा कांद्याला कमीभाव

यंदा कांद्यालासरासरी प्रतिक्‍विंटल दोन हजार ५९३ रुपयांचाच दर मिळत असून, बुधवारी (ता. २४) मुंबईत २६००, लासलगावात २४१२ रुपये, तर पुण्यात २४०० आणि सोलापुरात ३६०० रुपयेपर्यंतचा सर्वाधिक दर होता.
Onion prices fell by Rs 4250
Onion prices fell by Rs 4250

सोलापूर : अतिवृष्टीमुळे खरीप आणि लेट खरिपात कांद्याचे नुकसान झाल्याने रब्बी हंगामात कांद्याची लागवड वाढली आहे. तत्पूर्वी, गतवर्षी प्रतिक्‍विंटल कांद्याला ५८४९ रुपयांचा दर मिळाला. यंदा मात्र सरासरी प्रतिक्‍विंटल दोन हजार ५९३ रुपयांचाच दर मिळत असून, बुधवारी (ता. २४) मुंबईत २६००, लासलगावात २४१२ रुपये, तर पुण्यात २४०० आणि सोलापुरात ३६०० रुपयेपर्यंतचा सर्वाधिक दर होता. आगामी काळात आवक वाढणार असल्याने दर आणखी कमी होतील आणि शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड सोसावा लागेल. या पार्श्‍वभूमीवर कांद्याची निर्यात सुरू करावी, असे पत्र कृषी विभागाने केंद्र सरकारकडे पाठविले आहे.

लॉकडाउनमध्ये अडकलेल्या बळीराजाने खरीप हंगामात लागवड केलेल्या ८२ हजार ७४२ हेक्‍टरपैकी ४८ हजार हेक्‍टरवरील कांद्याचे नुकसान झाले. लेट खरिपातील दोन लाख १३ हजार हेक्‍टरपैकी १२ हजार हेक्‍टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले. त्यामुळे आता रब्बी हंगामात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आता बाजारात कांद्याची आवक वाढू लागली असल्याने कांद्याचे दर दिवसेंदिवस कमी होत आहेत. दरवर्षी ऑक्‍टोबर ते जानेवारी या काळातच शेतकऱ्यांना कांद्याचे दर चांगले मिळतात. मात्र यंदा आवक वाढल्याने आणि निर्यात बंदी असल्याने शेतकऱ्यांना चांगला, दर्जेदार कांदा कमी दराने विकावा लागत आहे.

गतवर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या काळात ५६ लाख २८ हजार मे. टन कांदा आवक झाला होता. यंदा जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ या काळात अंदाजित ४० लाख मे. टनापर्यंत कांदा बाजारात येऊ शकतो. त्यामुळे निर्यात सुरू करावी, अन्यथा लागवडीच्या खर्चाएवढाही दर शेतकऱ्यांना मिळणार नाही, असेही राज्य सरकारने केंद्राला कळविले आहे. प्रतिक्रिया.. राज्यभरात आतापर्यंत चार लाख हेक्‍टरवर कांदा लागवड झाली आहे. खरीप, लेट खरिपाचा कांदा खराब झाल्याने उन्हाळी कांद्याची लागवड वाढत आहे. त्यामुळे आवक वाढल्याने दर आणखी कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होईल. या पार्श्‍वभूमीवर निर्यात सुरू करावी, असे पत्र केंद्र सरकारला कृषी विभागाच्या माध्यमातून नुकतेच पाठविले आहे. - सुनील पवार, कार्यकारी संचालक, पणन

जानेवारीपर्यंतची तुलनात्मक स्थिती

  • यंदाची आतापर्यंतची कांदा लागवड :  ३,९९,७४० हेक्‍टर  
  • गतवर्षीची जानेवारीअखेर कांदा लागवड :  ६,१७,८५४ हेक्‍टर
  • यंदा डिसेंबरमधील कांदा आवक :  २,३६,३७२ मे.टन 
  • गतवर्षीची डिसेंबरअखेरची आवक :  ४,०९,२८३ मे.टन
  • डिसेंबरमधील मागील वर्षीचे दर :  ५,८४९
  • या वर्षीचा २३ डिसेंबरपर्यंतचा दर :  २,५९३
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com