कांदा बीजोत्पादन संकटात

शेतकऱ्यांचे बीजोत्पादनासाठी घेतलेले डेंगळ्यावर करपासदृश रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने लागवडी बाधित होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे बीजोत्पादनात घट होणार असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
कांदा बीजोत्पादन संकटात
Onion seed production in crisis

खामखेडा, जि. नाशिक : चालू वर्षीच्या सततच्या हवामानातील बदलांमुळे देवळा तालुक्यातील अनेक गावांत कांद्याचे बीजोत्पादन क्षेत्र संकटात सापडले आहे. शेतकऱ्यांचे बीजोत्पादनासाठी घेतलेले डेंगळ्यावर करपासदृश रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने लागवडी बाधित होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे बीजोत्पादनात घट होणार असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

तालुक्यातील नव्वद टक्‍क्‍यांहून अधिक कांदा उत्पादक शेतकरी खरीप लाल, रब्बीच्या उन्हाळ कांद्याचे बियाणे घरगुती पातळीवर बीजोत्पादन घेण्यासाठी पसंदी देतात. त्यासाठी दर्जेदार कांद्याची निवड करून त्याची कंद लागवड बियाणे तयार करण्यासाठी करतात. या वर्षी सुरुवातीपासूनच सततचे ढगाळ हवामान, धुके व दव यामुळे पीक संरक्षण उपाययोजना करूनही काहीच उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांद्याची पात, गोंडे येण्यापूर्वीच करपून नष्ट होऊ लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी हे डेंगळे नांगरून टाकले आहेत.

आता उन्हाळ कांदा संपुष्टात आला असताना पुन्हा अनेक शेतकरी शोध घेऊन बीजोत्पादन करण्यासाठी उन्हाळ कांदा शोधू लागले आहेत. अनेक  शेतकऱ्यांकडील उन्हाळ कांदा विकून झाला असल्याने कांदाच शिल्लक नसल्याने कांद्याचे बीजोत्पादनही घटणार आहे. अजूनही सततचे ढगाळ हवामान, धुके व संक्रांत उलटूनही दव पडत असल्याने या हवामानामुळे लाल, उन्हाळ कांद्याचे बीजोत्पादन मोठ्या प्रमाणात संकटात सापडल्याने पुढील हंगामात बियाण्याची टंचाई जाणवण्याची चिन्हे आहेत.

आम्ही अनेक वर्षांपासून कांद्याचे बीजोत्पादन घरीच, शेतात करतो. यंदा मात्र सततचे ढगाळ वातावरण, धुके यामुळे अक्षरशः करपा झाल्याने पीकच नष्ट करावे लागले आहे.  - गंगाधर मोतीराम शेवाळे, शेतकरी, खामखेडा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.