वीज जोडणीसाठीची ऑनलाइन प्रक्रिया ठप्प

महावितरणकडे शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर केल्यावर त्यांना वीज जोडणी देण्याची आमची जबाबदारी आहे. राज्यात सध्या ऑनलाइन डिपॉझिटची यंत्रणा बंद आहे. ती सुरू कधी होईल हा वरिष्ठ स्तरावरील निर्णय आहे. मात्र शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याची जबाबदारी आमची आहे. -अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता, महावितरण, कराड.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कऱ्हाड, जि. सातारा ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन आणि जुन्या विहिरींवर वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणकडे ऑनलाइन अर्ज करून डिपॉझिट भरावे लागते. त्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून अनुदान देण्यात येते. मात्र महिन्यापासून महावितरणची ऑनलाइन सेवा बंद असल्याने शेतकऱ्यांना डिपॉझिट भरता येत नाही. ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांचे डिपॉझिट भरून घेण्यात आले नाही तर शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहेत. 

विशेष घटक योजनेतील शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागून त्यांनी स्वतःच्या शेतीमध्ये विहीर घेत त्याचे पाणी शेतीकरिता वापरावे या हेतूने शासनाने संबंधित लाभार्थ्यांना अर्थसहाय्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नवीन आणि जुन्या विहिरींवर वीज जोडणीसाठी तीन एचपीच्या कनेक्‍शनसाठी ३ हजार२६३ आणि ५ एचपीच्या कनेक्‍शनसाठी ५ हजार २६३ रुपये अनुदान कृषी विभागाकडून देण्यात येते. त्यासाठी त्यांना महावितरणकडे ऑनलाइन अर्ज करून डिपॉझिट भरावे लागते.

त्यासाठीची कार्यवाही सध्या सुरू आहे. मात्र महिन्यापासून महावितरणची ऑनलाइन सेवा बंद असल्याने शेतकऱ्यांना डिपॉझिट भरता येत नाही अशी स्थिती आहे. त्यासंदर्भात शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यावर त्यांना प्रकरण सादर करा, वीज जोडणी मिळेल असे सांगितले आहे. त्यातून शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळेलही मात्र त्यांच्याकडून ३१ मार्चपर्यंत डिपॉझिट भरून घेण्यात आले नाही तर शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानापासून वंचित राहणार आहेत.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com