परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक 

परभणी : जिल्ह्यातऐन पेरणीच्या वेळी जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रांवर डीएपी खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक 
परभणीत केवळ ७६७ टन डीएपी शिल्लक 

परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी खताच्या वापरानुसार तसेच यंदा क्षेत्रात वाढ गृहीत धरून विविध ग्रेडच्या १ लाख ५४ हजार २०० टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती. परंतु कृषी आयुक्तालयाकडून ६० हजार ४३० टन एवढा म्हणजेच मागणीपेक्षा ९३ हजार ७७० टन कमी खतासाठा मंजूर करण्यात आला. त्यातही मंजूर साठ्यापेक्षा कमी पुरवठा केला जात आहे. ऐन पेरणीच्या वेळी जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रांवर डीएपी खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. 

रब्बी हंगामात ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत महिनानिहाय मंजूर खतसाठ्यानुसार पुरवठा केला जातो. यंदा ऑक्टोबर महिन्यासाठी विविध ग्रेडच्या रासायनिक खतांचा १० हजार टन साठा मंजूर आहे. परंतु आजवर केवळ १ हजार ८०० टन (१८ टक्के) खतांचा पुरवठा झाला आहे. त्यात युरिया १ हजार ४५० टन आणि संयुक्त खते ३५० टन यांचा समावेश आहे. रब्बी हंगामात जिल्ह्यात रासायनिक खतांचा सरासरी वापर ७३ जार २०० टन आहे. यंदा आयुक्तालयाकडून मंजूर खतसाठ्यात युरिया २० हजार ७७० टन, डीएपी ७ हजार १२० टन, पोटॅश १ हजार ९९० टन, सुपर फॉस्फेट १० हजार २७० टन, एनपीके ५ हजार टन या खतांचा समावेश आहे. 

३० सप्टेंबर अखेर विविध ग्रेडचा १९ हजार ७३७ टन खतसाठा शिल्लक होता. सोमवारी (ता.८) विविध ग्रेडचा २५ हजार टन खतसाठा शिल्लक होता. त्यात डीएपी ७६७ टन, युरिया ८ हजार ६०८ टन, एऩपीके (संयुक्त खते) १० हजार ४८१ टन या प्रमुख खतांचा समावेश आहे. अनेक विक्रेत्यांकडून पीओएस मशिनवर नोंदणी केली जात नसल्यामुळे खतसाठा शिल्लक दिसत आहे. परंतु प्रत्यक्षात अनेक विक्री केंद्रावरील फलकावर खतसाठा निरंक दिसत आहे. 

ऑक्टोबर महिन्यात मंजूर खतसाठ्यानुसार युरिया आणि एनपीके प्रत्येकी ५ हजार टन आणि डीएपी ४५० टन एवढा पुरवठा झाला. नोव्हेंबर महिन्यात युरिया २ हजार ८०० टन,डीएपी १ हजार ८०० टन, एऩपीके ८०० टन एवढा खतसाठा उपब्लध होणार आहे. मंजूर साठ्यापेक्षा कमी पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध होत नाही. 

प्रतिक्रिया... खताच्या किमती वाढल्या आहेत. रब्बीसाठी शेतकऱ्यांकडून मागणी वाढली आहे. पुरवठा केला जात नाही.त्यामुळे व्यापारी चढ्या दराने खताची विक्री करत आहेत. शेतकऱ्यांचे दुहेरी आर्थिक नुकसान होत आहे. पुरेसा खतसाठा उपलब्ध करून द्यावा. शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकरी, कष्टकऱ्यांना वेठीस धरले जात आहे.  - विलास बाबर, सुरपिंपरी, ता. परभणी 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com