वर्ध्यात केवळ पाच टक्के पीककर्ज वाटप

कोरोना नियंत्रणासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे पीककर्ज वितरण ही प्रभावित झाले आहे. त्यामुळेच जिल्ह्यात आजपर्यंत केवळ पाच टक्केच कर्जवाटप होऊ शकले. जूनपर्यंत ही टक्केवारी अवघी वीसपर्यंत जाईल, असा अंदाज अग्रणी बँकेच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.
Only five per cent crop loan allocation in Wardha
Only five per cent crop loan allocation in Wardha

वर्धा : कोरोना नियंत्रणासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे पीककर्ज वितरण ही प्रभावित झाले आहे. त्यामुळेच जिल्ह्यात आजपर्यंत केवळ पाच टक्केच कर्जवाटप होऊ शकले. जूनपर्यंत ही टक्केवारी अवघी वीसपर्यंत जाईल, असा अंदाज अग्रणी बँकेच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

वर्धा जिल्ह्यात बँकांना ५९४ कोटी १० लाख रुपये खरीप पीककर्जाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. रोहिणी नक्षत्र अवघ्या काही दिवसांवर असून खरीप हंगाम तोंडावर आला आहे. जिल्ह्यात चार लाख ३३ हजार ८५० हेक्‍टर खरिपाचे क्षेत्र आहे. या सर्व कारणांमुळे शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी आता बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत. अशातच कोरोना महामारीमुळे प्रशासनाकडून टाळेबंदी जाहीर करण्यात आल्याने ठरावीक वेळेतच शेतकऱ्यांना शेती संबंधित आपली कामे करावी लागतात.

गेल्या वर्षी चार ते पाच महिने टाळेबंदी होती. या वेळीही मार्च महिन्यापासून निर्बंध लावण्यात आले आहेत. शासकीय कार्यालयात १५ टक्के उपस्थितीचा नियम लागू करण्यात आला आहे. ८ ते १८ मेपर्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आल्याने या काळात बँकाही बंद होत्या. ग्रामीण भागात १५ ते २० गावांचे व्यवहार लगतच्या मोठ्या गावचा अवलंबून असतात. संचारबंदी आणि वाहतुकीची साधने ठप्प आहेत. प्रशासनाने नागरिकांना घरात राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे कर्जवाटपाची प्रक्रिया रखडली आहे. या साऱ्याच्या परिणामी जिल्ह्यात आजपर्यंत केवळ पाच टक्के कर्जवाटप होऊ शकले, अशी माहिती सूत्रांनी दिली. कर्जवाटपात बँक ऑफ इंडियाने आघाडी घेतली असून, अकरा कोटी पाच लाख रुपयांचे कर्ज वितरित केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com