मराठवाड्यात केशर आंबा लागवडीस वाव : डॉ. पाटील

औरंगाबाद ः ‘‘केशर आंबा, लागवडीस मराठवाड्यात वाव आहे,’’ असे मत हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे डॉ. एम. बी. पाटील यांनी व्यक्त केले.
मराठवाड्यात केशर आंबा  लागवडीस वाव : डॉ. पाटील
opportunity for Plantation to Saffron Mango : Dr. Patil

औरंगाबाद ः ‘‘केशर आंबा, लागवडीस मराठवाड्यात वाव आहे,’’ असे मत हिमायतबाग फळ संशोधन केंद्राचे डॉ. एम. बी. पाटील यांनी व्यक्त केले.

मराठवाडा विभाग हा अनेक फळपिकांसाठी राज्यात नव्हे, तर देशात ओळखला जातो. उदाहरण द्यायचे झाले, तर जालना, औरंगाबाद जिल्ह्यातील मोसंबी हे फळपीक आहे. त्याच सोबत सीताफळ, डाळिंब, पेरू, आंबा, द्राक्षे आदी फळपिकांचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. चिंच लागवडीसाठी देखील शेतकरी पुढे येत आहे.

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘शेतकरी घन लागवड करत आहेत. पण, यामध्ये शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. काही शेतात लागवड फारच जवळ केलेली आहे. परंतु यामध्ये ५ बाय ४ मीटर अंतर योग्य आहे. या अंतरावर झाडाची वाढही चांगली होते. बागेत हवा ही खेळती राहते. केशर आंब्याच्या बागा मराठवाड्यात वाढत आहेत. परंतु, या सोबत त्याचे व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने झाले पाहिजे. आंब्याची बाग जोपासणे तसे जिकरीचे म्हणता येईल. कारण सर्वच प्रकारच्या जमिनीत आंबा येत नाही. यासाठी जमिनीची खोली जास्त असता कामा नये. वेळोवेळी कीड व्यवस्थापण विषयी जागृत असले पाहिजे.’’ 

‘‘मोसंबी आणि आंबा या दोन्ही फळपिकांत बहर, मोहर येईल. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. या वेळेस शेतकऱ्यांनी बागेस खत देऊन व्यवस्थापण केले पाहिजे. याच बरोबर लहान शेतकऱ्यांनी बांधावर फळझाडे लावून कुटुंबाची गरज भागवली जाईल, या कडेही लक्ष दिले पाहिजे,’’ असेही डॉ. पाटील म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.