काटोल बाजार समितीत संत्र्याला मिळाला तेरा हजारांचा भाव

बाजारात स्पर्धा वाढत शेतकऱ्यांना संत्रा विक्रीतून चांगला पैसा मिळावा, या उद्देशाने काटोल बाजार समितीकडून संत्रा मंडीची सुरुवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन बाजार समिती सभापती तारकेश्वर शेळके यांनी केले.
Oranges fetched Rs 13,000 at Katol Bazar Samiti
Oranges fetched Rs 13,000 at Katol Bazar Samiti

नागपूर  : बाजारात स्पर्धा वाढत शेतकऱ्यांना संत्रा विक्रीतून चांगला पैसा मिळावा, या उद्देशाने काटोल बाजार समितीकडून संत्रा मंडीची सुरुवात करण्यात आली आहे.  शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन बाजार समिती सभापती तारकेश्वर शेळके यांनी केले. 

बुधवारपासून (ता. ११) काटोल बाजार समितीच्या यार्डात संत्रा खरेदीची सुरवात झाली. पहिल्याच दिवशी १३५ टनापेक्षा अधिक संत्र्यांची आवक झाली. संत्र्याला १० हजार ते १३ हजार रुपये प्रति टन भाव मिळाला. या वेळी संत्रा घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा सभापती तारकेश्वर शेळके यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सभापती तारकेश्वर शेळके म्हणाले, ‘‘कोरोना काळात शेतकऱ्यांची चौफेर आर्थिक कोंडी झाली होती. अशा अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने बाजार समितीने संत्रा मंडीची सुरवात करण्याचा निर्णय घेतला. मात्र करोनाचे संकट अद्यापही कायम असल्याने शेतकऱ्यांनी या संदर्भात शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून शेतमाल विक्रीसाठी आणावा.’’

या वेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर कोल्हे, संचालक अजय लाडसे, अंगद भैस्वार, अनिल ढोणे, गणेश चन्ने, आयुब पठाण, अरुण राऊत, अरुण पुंड, सचिव पराग दाते,  बाजार समिती कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com