साताऱ्यातील १७ कृषी सेवा केंद्रांना विक्री बंदचे आदेश

सातारा : कृषी सेवा केंद्र तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात तीन कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचा परवाना निलंबित केला. तर चार बियाणे दुकाने, १० खत दुकाने व ३ कीटकनाशकांच्या दुकानांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Order to close sale to 17 agricultural service centers in Satara
Order to close sale to 17 agricultural service centers in Satara

सातारा : कृषी सेवा केंद्र तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात तीन कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचा परवाना निलंबित केला. तर चार बियाणे दुकाने, १० खत दुकाने व ३ कीटकनाशकांच्या दुकानांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सात कृषी निविष्ठा विक्री केंद्रांना दस्तऐवज अद्ययावत न ठेवल्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

कृषी सेवा केंद्र तपासणी मोहिमेंतर्गत जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्री केंद्राची कृषी विभागामार्फत २२६ व जिल्हा परिषद कृषी विभागांतर्गत ५२० अशा एकूण ६४६ विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली. यात तीन कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचा परवाना निलंबित केला, तर चार बियाणे दुकाने, १० खत दुकाने व ३ कीटकनाशकांच्या दुकानांना विक्री बंद करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. तसेच सात कृषी निविष्ठा विक्री केंद्रांना दस्तऐवज अद्ययावत न ठेवल्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली आहे.

तसेच कोल्हापूर विभागीय भरारी पथकाकडून म्हासुर्णे (ता. खटाव) येथील मे. माळवे फर्टिलायझर या दुकानावर छापा टाकून विना परवाना विक्रीसाठी ठेवलेल्या पीडीएम पोटॅश खताच्या ३६० गोण्या जप्त करून वडूज पोलिसांत गुन्हा दाखल केला.

कृष्णा फर्टिलायझर, पानवन (ता. माण) या खत कारखान्यावर जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक सातारा यांनी छापा मारून विना परवाना तयार होत असलेला बोगस खताचा साठा यामध्ये फॉस्फेट रिच ऑरगॅनिक मॅनियूरच्या ५० बॅगा, नॅचरल पोटॅशच्या २३५ बॅगा, ca:mg:s (१०:५:१०)च्या २९५ बॅगा असा एकूण सुमारे ४ लाख ९८ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com