सोलापूर जिल्ह्यातील मूळ दस्त लवकरच ऑनलाइन दिसणार : सानप

सोलापूरजिल्ह्यातील मूळ दस्तांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. त्या कामाची गुणवत्ता, चुका तपासणीचे काम सुरू आहे. येत्या पाच-सहा महिन्यांत नागरिकांना आपले मूळ दस्तऐवज ऑनलाइन पाहता येतील.
The original documents in Solapur district will soon appear online: Sanap
The original documents in Solapur district will soon appear online: Sanap

सोलापूर  : ‘‘राज्य शासनाने राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व मूळ दस्ताऐवजांचे (अभिलेखे) स्कॅनिंग करण्याचे काम हाती घेतले आहे. जिल्ह्यातील भूमी अभिलेख खात्याकडील सर्व मूळ दस्तऐवज (अभिलेखे) आणि तहसील विभागाकडील उतारे एका वर्षात १०० टक्के स्कॅन केले आहेत.  तपासणीचे काम सुरू आहे,’’ अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांनी दिली.

सानप म्हणाले, ‘‘जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जमिनीची मोजणी करून देणे आणि नगर भूमापन (सिटी सर्वे) झालेल्या मिळकतीवर फेरफार नोंदणी घालण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आहे. तहसीलदार कार्यालयाकडील सातबारा उतारे, फेरफार, नमुना ८ अ, कडई पत्रक, इनाम पत्रक, जन्म-मृत्यू नोंदी या कागदपत्रांचेही काम पूर्ण झाले आहे. भूमी अभिलेख आणि तहसीलदार कार्यालय असे एकूण १ कोटी ३३ लाख ७८ हजार ७६७ अभिलेखे आहेत. या सर्व अभिलेख्यांचे १०० टक्के स्कॅनिंग झाले आहेत. यामध्ये इंग्रजांच्या काळापासूनचे दस्त (अभिलेखे) आहेत. दस्त जीर्ण झाल्याने हाताळता येत नाहीत. नागरिकांना याची नक्कलही देता येत नाही. जीर्ण झालेले, फाटलेल्या दस्तांचे पुनर्लेखन केले आहे. त्याचेही स्कॅनिंग पूर्ण झाले आहे.’’

स्कॅनिंग झालेल्या अभिलेख्यांची तालुकानिहाय आकडेवारी

माढा तहसील (८ लाख, ९३ हजार २५२), माढा भूमी अभिलेख (१ लाख, ६ हजार १८२), उत्तर सोलापूर तहसील (५ लाख, ९० हजार ५११), उत्तर सोलापूर भूमी अभिलेख (७० हजार ९१), मोहोळ तहसील (१२ लाख ९९ हजार ४०२), मोहोळ भूमी अभिलेख ( २लाख ८ हजार ४७८), सांगोला तहसील (१५ लाख, १७ हजार ५४९), सांगोला भूमी अभिलेख (१ लाख ६५ हजार ८५९), अक्कलकोट तहसील (९ लाख ९२ हजार ४६), अक्कलकोट भूमी अभिलेख (१ लाख ८३ हजार ४४२), दक्षिण सोलापूर तहसील (७ लाख, ४३ हजार २२०), दक्षिण सोलापूर भूमी अभिलेख (६६ हजार ५२०) 

बार्शी तहसील( १० लाख ६९ हजार ४१७), बार्शी भूमी ‌अभिलेख (१ लाख, ८१ हजार ३५७), करमाळा तहसील (६ लाख ६८ हजार ५५७), करमाळा भूमी अभिलेख (१ लाख, ३९ हजार ८५१), मंगळवेढा तहसील (६ लाख, ४८ हजार ७५२), मंगळवेढा भूमी अभिलेख (१ लाख ११ हजार २७४), पंढरपूर तहसील (१५ लाख, १७ हजार ७९१), पंढरपूर भूमी अभिलेख (२ लाख, २५ हजार ९७५), माळशिरस तहसील ( १५ लाख, ३८ हजार ४८९), माळशिरस भूमी अभिलेख (२ लाख, ९९ हजार ४३१) आणि सोलापूर नगर भूमापन  कार्यालयाकडील (१ लाख, ४१ हजार ३२१) असे एकूण १ कोटी ३३ लाख ७८ हजार ७६७ अभिलेख्यांचे स्कॅनिंग झाले आहे.

हा होणार फायदा...

  •  केवळ गट नंबर, खाते नंबर, सर्व्हे नंबर टाकल्यास एका क्लिकवर माहिती दिसणार.
  •  जीर्ण अभिलेखे फाटण्याची भीती नाही, ते पाहता येणार.
  •  हेलपाटे मारण्याची आवश्यकता नाही.
  •  वेळ, पैशाची बचत होणार.
  •  बनावटगिरी, दलालाला आळा बसेल.
  •  कधीही, कोठेही ऑनलाइन पाहता येणार 
  • मूळ दस्तांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. त्या कामाची गुणवत्ता, चुका तपासणीचे काम सुरू आहे. येत्या पाच-सहा महिन्यांत नागरिकांना आपले मूळ दस्तऐवज ऑनलाइन पाहता येतील.  - हेमंत सानप, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, सोलापूर.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com